आईने लावली हळद
घनश्यामने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर थेट हळदीच्या विधीचा एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये घनश्याम पारंपरिक पद्धतीने एका पाटावर बसलेला दिसत आहे आणि त्याची आई त्याला खूप प्रेमाने हळद लावत आहे. या व्हिडीओला त्याने दिलेल्या कॅप्शनने तर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. तो लिहितो, "नवरदेव झालो ना राव... हळद लागली एकदाची... माझं पण ठरलं बरं का... यायला लागतंय!"
advertisement
या पोस्टमुळे 'छोटा पुढारी'च्या लग्नाची तारीख जवळ आली असावी, असे चाहत्यांना वाटू लागले. व्हिडीओच्या शेवटी तो शेरवानी आणि बुट घेण्यासाठी दुकानात फिरतानाही दिसतो, ज्यामुळे लग्नाची तयारी जोरात सुरू असल्याचे स्पष्ट होते.
चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
घनश्यामचा हा हळदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्याला शुभेच्छा देण्यासोबतच अनेक चाहत्यांनी या नवरदेवावर खूपच मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने विचारले, "किती फूटाची आहे नवरी?" तर दुसऱ्याने, "बाळ आता मंडपात येणार!" अशी गंमतीशीर कमेंट केली. काही नेटकऱ्यांनी तर थेट कायद्याचाही धाक दाखवला! एका युजरने, "अरे घनश्या, बालविवाह करू नकोस रे!" तर दुसऱ्याने, "बालविवाहाची केस होईल बाबा! कायद्याने गुन्हा आहे राव, सावध!" अशा भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
सूरज चव्हाणनंतर आता छोटा पुढारीही नव्या आयुष्याला सुरुवात करणार असल्याने 'बिग बॉस मराठी ५' च्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. मात्र, घनश्यामचा हा व्हिडिओ केवळ प्रँक आहे की तो खरंच लग्न करतोय, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
