अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात मतभेद आणि घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या, पण जेव्हा ते मुलगी आराध्याच्या शाळेच्या कार्यक्रमात आणि लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एकत्र दिसले तेव्हापासून या चर्चा शांत झाल्यात. नुकतेच अभिषेक आणि ऐश्वर्यानेही नवीन वर्ष एकत्र साजरे केले आणि आता ते मुंबईला परतले आहेत.
( ऑल इज वेल! लेकीच्या शाळेत पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, बायकोची काळजी घेताना दिसला अभिनेता, VIDEO )
advertisement
यावेळी, अभिषेकने राखाडी रंगाची हुडी परिधान केली होती, तर ऐश्वर्या आणि आराध्याने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. ऐश्वर्या आणि आराध्या खूप आनंदी दिसत आहेत. ऐश्वर्याने पापाराझींना केवळ शुभेच्छा दिल्या नाहीत तर त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.
अभिषेकने पॅप्सना हसत नमस्कार केला
अभिषेकही हसत हसत विमानतळाबाहेर आला आणि पापाराझींचे हात जोडून स्वागत केले. विमानतळावर अभिषेकची केअरिंग स्टाईल दिसली. त्याने ऐश्वर्या आणि आराध्याला आपल्या कारच्या मागच्या सीटवर बसवले आणि नंतर ते स्वतः त्याच कारमधून घराकडे निघाले.
ऐश्वर्या आणि अभिषेकला एकत्र पाहून चाहते खूश
ऐश्वर्या आणि अभिषेकचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते खूश झाले आणि व्हिडिओवर अनेक कमेंट येत आहेत. एकाने लिहिले आहे की, 'दोघांना एकत्र पाहून खूप आनंद झाला.' आणखी एका चाहत्याने सांगितले की, 'ऐश्वर्या दिवसेंदिवस सुंदर होत आहे.' तर एका यूजरने म्हटले, सलमान भाईने डोस दिला असेल.
अमिताभ आणि जयाही परतले
अभिषेक-ऐश्वर्या यांच्याबरोबरच अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे देखील नवीन वर्ष साजरे करून मुंबईत परतले आहेत. दोघे टीना अंबानी आणि रीमा जैन यांच्यासोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली होती.