TRENDING:

2026 मध्ये बॉक्स ऑफिस गाजवणार अमिताभ बच्चन यांचे हे चित्रपट, सगळे सीक्वेल

Last Updated:

2026 हे वर्ष अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास ठरणार आहे. सगळेच चित्रपट मोठ्या बॅनरचे आणि सीक्वेल असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिनेते अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या ट्विटमुळे कायम चर्चेत असतात. सध्या ते केबीसी देखील होस्ट करत आहेत. 2026 हे वर्ष अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास ठरणार आहे. कारण त्यांचे मोस्ट अवटेड सिनेमे या वर्षात रिलीज होणार आहेत. त्यांचे हे सगळे सिनेमे सीक्वेल आहेत. सिनेमांच्या पहिल्या भागाने बक्कळ कमाई केली आहे. आता त्यांच्या या सीक्वेलची प्रेक्षक वाट पाहत आहेत. कोणते आहेत ते सिनेमे पाहूयात.
News18
News18
advertisement

बिग बी वयाच्या 82 व्या वर्षीही त्यांची एनर्जी, पर्सनॅलिटी आणि स्क्रीन प्रेझेन्सने चाहत्यांची मनं जिंकतात.  विशेष म्हणजे या वयातही ते इंडस्ट्रीमध्ये तितक्याच जोमाने सक्रिय आहेत आणि त्यांच्या चित्रपटांनी आजही थिएटर्स हाऊसफुल होतात. 2026 हे वर्ष अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास ठरणार आहे. सगळेच चित्रपट मोठ्या बॅनरचे आणि सीक्वेल असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

advertisement

कल्की 2898 Part 2

2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या Kalki 2898 AD या मेगा बजेट चित्रपटाचा दुसरा पार्ट यावर्षी येणार आहे. या चित्रपटात बिग बींनी अश्वत्थामाची दमदार भूमिका साकारली होती. सिनेमात दीपिका पादुकोण आणि प्रभासही प्रमुख भूमिकेत होते. दुसऱ्या पार्टमध्ये अभिनेत्री दीपिका दिसणार नाही.  2026 मध्ये हा सीक्वेल रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

advertisement

ब्रह्मास्त्र 2

2022 मध्ये रिलीज झालेला ब्रम्हास्त्र या सिनेमाचा सीक्वेल देखील 2026 मध्ये येण्याची शक्यता आहे. या सिनेमात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत होते. या सिनेमात बिग बींनी गुरुची भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आता ‘ब्रह्मास्त्र 2’मध्ये बिग बींची अधिक महत्त्वाची भूमिका असणार असल्याचं म्हटलं जात आहे. अयान मुखर्जीने हा सिनेमा डायरेक्ट केला आहे.

advertisement

आंखें 2

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत असलेला आँखे हा सिनेमा देखील 2026 मध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटात बिग बींसोबत संजय दत्त आणि सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात अमिताभ बच्चन खलनायकाच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
2026 मध्ये बॉक्स ऑफिस गाजवणार अमिताभ बच्चन यांचे हे चित्रपट, सगळे सीक्वेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल