मौसमी चॅटर्जी यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक हिट चित्रपट बॉलिवूड इंडस्ट्रीला दिले आहेत. त्यांनी अमिताभ यांच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामध्ये बेनाम, रोटी कपडा और मकान, मंजिल सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. इतक्या चित्रपटांमध्ये एकत्र काम करून सुद्धा अमिताभ यांनी मेकर्सकडे मौसमी यांना चित्रपटातून काढून टाकण्यासाठी सांगितले होते. त्या चित्रपटाचं नाव, 'बरसात की एक रात' असं होतं. पहिले चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्या विरूद्ध मौसमी चॅटर्जी काम करणार होत्या. परंतु, मौसमी यांना अचानक चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि त्यांच्याजागी राखी गुलजारला कास्ट करण्यात आले.
advertisement
नयनदीप रक्षीतला दिलेल्या मुलाखतीत मौसमी चॅटर्जी यांनी त्यांना चित्रपटातून काढून टाकण्याविषयीच्या मुद्द्यावर भाष्य केले की, "तो चित्रपट प्रॉड्युसर शक्ती सामंतचा 'बरसात की एक रात' चित्रपट होता. एक दिवशी मला शक्ती अंकलने फोन करून विचारलं, 'तुझं अमिताभ सोबत काही भांडण झालंय का?' मी त्यांना म्हणाले, 'काका, मी कोणाशीही इतकी जवळची नाहीये की माझ्याशी भांडू शकेन. मी खूप मैत्रीपूर्ण आणि चांगली आहे, असं मला अनेकजण म्हणाले..' ते म्हणाले की, 'हीच समस्या आहे.', बहुतेक नायक म्हणतात, 'तुम्ही मौसमीला का निवडले? आमचं तिच्यासोबतचं रिलेशन इतकंही खास नाहीये."
मौसमी चॅटर्जी यांनी अमिताभ बच्चन किंवा इतर स्टार्ससोबत त्यांचा संवाद कसा होता? याबद्दल सांगितले, अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, "त्यांनी मला विचारले, 'तुला ट्यूनिंग म्हणजे काय हे माहित आहे का?' मी म्हणाले, 'कदाचित, आता मला समजले. कदाचित ते मैत्रीपेक्षा जास्त असेल. पण मी इथे मैत्री करण्यासाठी आलेली नाही. मी इथे काम करण्यासाठी आले आहे. म्हणूनच शक्ती काकांनी मला चित्रपटातून काढून टाकले. मी त्यांना सांगितलं की मी माझी साइनिंग रक्कम परत करत आहे.' मला ते म्हणाले की, 'नाही, ते पैसे ठेव तुझ्याकडे, मी पुढचा चित्रपट तुझ्यासोबत करेन.' मग मी 'आनंद आश्रम' त्यांच्या चित्रपटात काम केले. मी समजू शकते की ते त्यांचं नंबर 1 स्टारसोबत आपलं रिलेशन नाही खराब करू शकत."
