TRENDING:

'पप्पा, जर काही झाले तर मी...' दुबईत अडकलेल्या Ammy Virk च्या लेकीचा डोळ्यात पाणी आणणारा मेसेज

Last Updated:

दुबईमध्ये अडकलेल्या प्रवाशांमध्ये पंजाबी गायक ॲमी विर्कच्या फॅमिलीचाही  समावेश आहे. त्याने भावुक पोस्ट शेअर करत पत्नी आणि लहान मुलीच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: अमेरिका, इराण आणि इस्रायल या देशांमधील वाढत्या संघर्षामुळे अनेक देशांमधील हवाई प्रवास बंद करण्यात आला आहे. यामुळे जगभरातल्या प्रवाशांचा खोळंबा झालाय. त्या तिनही देशांमधून अनेक प्रवासी आपल्या मायदेशी परतण्यासाठी सरकारकडे मदत मागत आहेत. यामध्ये फक्त सामान्य नागरिकच नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी, त्यांचे कुटुंबीय सुद्धा यामध्ये अडकले आहे. आता अशातच एका लोकप्रिय गायकाने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे, जिची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
ammy virk emotional post about memories of wife trapped in uae during Iran conflict heartbreaking assurance from 6 year old daughter
ammy virk emotional post about memories of wife trapped in uae during Iran conflict heartbreaking assurance from 6 year old daughter
advertisement

दुबईमध्ये अडकलेल्या भारतीय प्रवाशांमध्ये सुप्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता ॲमी विर्कच्या फॅमिलीचाही  समावेश आहे. त्याने इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर करत त्याच्या पत्नी आणि लहान मुलीच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्याच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. दरम्यान, गायकाने शेअर केलेली इन्स्टा पोस्ट त्याने डिलिट केलेली आहे. पंजाबी गायक अ‍ॅमी विर्क त्याच्या फॅमिलीसोबत पंजाबमध्ये राहतो. ॲमी विर्कने पोस्टमध्ये लिहिलंय की, "माझी पत्नी आणि सहा वर्षांची लेक सध्या युएईमध्ये आहे. मध्यपूर्वेकडील देशामध्ये तणाव वाढल्यामुळे आणि हवाई प्रवास रद्द झाल्यामुळे त्या परत येऊ शकत नाहीत. "

advertisement

गायक आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणालाय की, "यूएईमधील परिस्थिती माझ्या मनावर खूप भारी पडत आहे. माझी पत्नी आणि सहा वर्षांची मुलगी तिथे आहे. एक पती आणि वडील म्हणून, अशा वेळी भावुक किंवा दुःखी होणे सहाजिक आहे." पोस्टमध्ये गायकाला त्याच्या लेकीने एक दिलासा दिला. त्याबद्दल गायकाने लिहिले की, "पप्पा, जर काही झाले तर मी पलंगाखाली लपून राहीन. मी एक स्ट्राँग मुलगी आहे, पप्पा, काळजी करू नका." ॲमीने लिहिले की कोणत्याही वडिलांना अशा गोष्टी ऐकायच्या नसतात. अशावेळी प्रत्येक बातमी वैयक्तिक वाटते. आपण सार्वजनिक रित्या कितीही मजबूत दिसण्याचा प्रयत्न केला तरी, आपण सर्व कुटुंबातील सदस्य आहोत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रंगांची उधळण आणि आनंदाचा सोहळा, पुण्यात विशेष मुलांसाठी ‘रंग बरसे’चा जल्लोष
सर्व पहा

ॲमीने पोस्टमध्ये असेही म्हटले की, माझी प्रार्थना फक्त माझ्या कुटुंबीयांसाठीच करत नसून ज्यांना ज्यांना आक्रमाणांचा त्रास झाला, ज्यांनी आपल्या जवळचे व्यक्ती गमावले त्या सर्वांसाठी प्रार्थना केली. पुढे एमीने लिहिले, "मी यूएई अधिकारी आणि यूएई सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करतो. मला जे सांगितले गेले आहे, त्यावरून ते या काळात लोकांना सुरक्षित आणि पाठिंबा देण्यासाठी खूप परिश्रम करत आहेत. त्यासाठी मी खरोखर आभारी आहे. चला, तेथील प्रत्येकासाठी शांती, स्थिरता आणि कल्याणासाठी प्रार्थना करत राहूया. सर्व पुर्ववत शांत होईल आणि प्रत्येकाचे कुटुंब सुरक्षित राहिल." अभिनेत्याच्या पोस्टवर चाहते कमेंट करत आहेत आणि त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'पप्पा, जर काही झाले तर मी...' दुबईत अडकलेल्या Ammy Virk च्या लेकीचा डोळ्यात पाणी आणणारा मेसेज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल