TRENDING:

रंगांची उधळण आणि आनंदाचा सोहळा, पुण्यात विशेष मुलांसाठी ‘रंग बरसे’चा जल्लोष, Video

Last Updated:

‘रंग बरसे’ हा विशेष मुलांसाठीचा रंग महोत्सव यंदा 31 व्या वर्षात पदार्पण करत अधिक उत्साहात साजरा करत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : शहरात धुलिवंदनचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असताना आज पुण्यातील टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय मैदानावर रंगांची उधळण आणि आनंदाचा अनोखा सोहळा पार पडतो. भोई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘रंग बरसे’ हा विशेष मुलांसाठीचा रंग महोत्सव यंदा 31 व्या वर्षात पदार्पण करत अधिक उत्साहात साजरा करत आहे.
advertisement

विशेष मुलांच्या आयुष्यात आनंद, आत्मविश्वास आणि सामाजिक सहभागाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो. यंदा या रंग महोत्सवात तब्बल 22 संस्थांचा सहभाग नोंदवला गेला. विविध विशेष शाळा, स्वयंसेवी संस्था आणि पुनर्वसन केंद्रांतील सुमारे 2500 मुलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत रंगपंचमीचा आनंद लुटला.

मैदानावर सकाळपासूनच रंगांची उधळण सुरू झाली होती. मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, हास्य आणि जल्लोष हेच या उपक्रमाचे उद्देश आहे. स्वयंसेवकांनी मुलांसोबत रंग खेळत त्यांना सुरक्षित आणि आनंददायी वातावरण उपलब्ध करून दिले. कार्यक्रमासाठी वापरण्यात आलेले सर्व रंग नैसर्गिक असल्याने मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली. रासायनिक रंगांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी आयोजकांनी पर्यावरणपूरक रंगांचा वापर केला आहे.

advertisement

137 वर्षांची परंपरा, राजासंगे लोक खेळतात महाराष्ट्रात इथं होळी, हत्तीवरून होते रेवड्यांची उधळण, Video

कार्यक्रमात संगीत, नृत्य आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचाही समावेश करण्यात आला असून ढोल-ताशांच्या गजरात आणि रंगांच्या वर्षावात विशेष मुलांनी मनमुराद आनंद घेत पालक आणि शिक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. गेली तीन दशके हा उपक्रम सातत्याने राबवला जात असून प्रत्येक वर्षी सहभागी संस्थांची आणि मुलांची संख्या वाढत आहे. समाजातील सर्व घटकांनी विशेष मुलांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य केले पाहिजे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रंगांची उधळण आणि आनंदाचा सोहळा, पुण्यात विशेष मुलांसाठी ‘रंग बरसे’चा जल्लोष
सर्व पहा

रंगपंचमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा ‘रंग बरसे’ महोत्सव विशेष मुलांसाठी आनंदाची पर्वणी ठरत असून रंगांच्या माध्यमातून आनंद, समानता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा उपक्रम पुणेकरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
रंगांची उधळण आणि आनंदाचा सोहळा, पुण्यात विशेष मुलांसाठी ‘रंग बरसे’चा जल्लोष, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल