‘बिग बॉस १९’ मध्ये अंकिता वालावलकरची एंट्री?
'बिग बॉस मराठी ५' गाजवलेली आणि 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर ‘बिग बॉस १९’ मध्ये वाइल्ड कार्ड म्हणून एंट्री घेणार आहे, अशी बातमी पसरली होती. यावर स्वतः अंकितानेच एक व्हिडिओ शेअर केला आहे.
अंकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणते, “नमस्कार मंडळी! जसं की तुम्हाला माहितीये, ‘बिग बॉस’ हिंदीच्या घरात माझी वाइल्ड कार्ड एंट्री होतेय आणि यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझ्या गाठीशी अनुभवसुद्धा आहे. त्यामुळेच या प्रवासासाठी मी खूप उत्सुक आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात असताना तुम्ही मला खूप प्रेम दिलं होतं आणि आता ‘बिग बॉस हिंदी’च्या ट्रॉफीपर्यंत…”
advertisement
तिचं हे वाक्य पूर्ण होतं, तोच तिचा नवरा कुणाल आणि तिची बहीण तिला झोपेतून उठवतात. यातून असं समजतं की, अंकिता ‘बिग बॉस’मध्ये जाण्याचं स्वप्न पाहत होती.
या व्हिडिओमध्ये 'आता गेम बदलेल कारण वाइल्ड कार्ड एंट्री होणार' असं कॅप्शन देऊन अंकिताने चाहत्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत असून, अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता धनंजय पोवारने मजा घेत म्हटलं, “कुणाल बाळा माझी इच्छा तू पूर्ण केलीस. मित्रा आज खूप आनंद झाला. जोरात मारलंस ना?” अनेकांनी कमेंट करून “तुझं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल!” असं म्हटलं आहे.