लग्नाची तारीख पुढे ढकलल्यापासून सोशल मीडियावर पलाशवर एकापाठोपाठ एक आरोप केले जात आहेत. सुरुवातीच्या आरोपांमध्ये पलाश दुसऱ्या महिलेशी बोलत असल्याच्या काही चॅट्सचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले. या स्क्रीनशॉट्सच्या आधारावर लोकांनी पलाशवर स्मृतीची फसवणूक करत असल्याचा आरोप केला.
यानंतर हे प्रकरण इतके वाढले की, लग्नाच्या डान्स परफॉर्मन्ससाठी टीममध्ये असलेली कोरिओग्राफर नंदिका द्विवेदीचे नाव या वादाशी जोडले जाऊ लागले. पलाश आणि नंदिका यांच्यात जवळीक वाढल्याचा आणि स्मृतीला याची कल्पना नसल्याचा दावा अनेक सोशल मीडिया युजर्सनी केला. या सर्व चर्चा केवळ सोशल मीडियावरील असून, अद्याप कोणताही अधिकृत स्रोत किंवा व्यक्तीने या दाव्यांची पुष्टी केलेली नाही.
advertisement
नंदिकाच्या मैत्रिणीने केले मोठे विधान
इंटरनेटवरील हा गदारोळ वाढत असताना, अखेर कोरिओग्राफरच्या टीममधील एका व्यक्तीने यावर मौन सोडले. नंदिकाची जवळची मैत्रीण आणि कोरिओग्राफर गुलनाज खान हिने सोशल मीडियावर स्पष्ट केले की, नंदिकाचा या वादाशी काहीही संबंध नाही. "फक्त कोणासोबत फोटो असणे किंवा ओळख असणे, म्हणजे ती व्यक्ती कोणाच्या खासगी आयुष्यात सामील आहे, असे मानणे पूर्णपणे चुकीचे आहे," असे तिने ठामपणे सांगितले. गुलनाजच्या मते, पलाश आणि नंदिकाचे नाते केवळ व्यावसायिक होते आणि हे आरोप निराधार आहेत.
पलाशच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
या तणावाच्या वातावरणात पलाशच्या आईनेही प्रतिक्रिया दिली आहे. पलाशच्या आईने सांगितले की, सध्या कुटुंबातील सर्वजण खूप तणावातून जात आहेत. पलाश स्वतः लग्नासाठी खूप उत्सुक होता आणि त्याने आपल्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी घरात खास तयारीही केली होती.
डॉक्टरांच्या मते, पलाशला खूप स्ट्रेस आल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते, पण आता त्याला डिस्चार्ज मिळाला आहे. स्मृतीचे वडीलही आता घरी परतले आहेत. स्मृतीच्या वडिलांची आणि पलाशची तब्येत सुधारली असली तरी, लग्नाच्या नवीन तारखेबद्दल कुटुंबाकडून किंवा कपलकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही, त्यामुळे या प्रकरणाचा सस्पेंस अजूनही कायम आहे.
