Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचं ब्लॉकबस्टर गाणं, सनी देओलसोबत केला भरभरून रोमान्स, लाजून गुलाबी झाला होता अभिनेता

Last Updated:

Sunne Deol-Madhuri Dixit Song: सनी देओलने एका ब्लॉकबस्टर गाण्यात धक धक गर्ल माधुरी दीक्षित सोबत जबरदस्त रोमान्स केला होता, पण तेव्हा त्याची काय अवस्था झाली होती, याचा खुलासा खुद्द माधुरीनेच केला आहे.

News18
News18
मुंबई: बॉलिवूडमध्ये 'ढाई किलो का हाथ' आणि अॅक्शनसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता सनी देओलचा स्वभाव खऱ्या जीवनात खूपच लाजाळू आणि साधा मानला जातो. याच लाजाळू अभिनेत्याने एका ब्लॉकबस्टर गाण्यात धक धक गर्ल माधुरी दीक्षित सोबत जबरदस्त रोमान्स केला होता, पण तेव्हा त्याची काय अवस्था झाली होती, याचा खुलासा खुद्द माधुरीनेच केला आहे.
सनी देओल आणि माधुरी दीक्षित यांची जोडी १९८९ मध्ये आलेल्या 'त्रिदेव' या चित्रपटात एकत्र दिसली होती. ही जोडी पडद्यावर खूपच जमून आली होती. या चित्रपटातील 'मैं तेरी मोहब्बत में पागल हो जाऊंगा...' हे गाणे आजही लोकांच्या ओठांवर आहे. मोहम्मद अझीझ आणि साधना सरगम यांच्या आवाजात, कल्याणजी-आनंदजी यांच्या संगीताने सजलेल्या आणि आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या या गीताची जादू आजही कायम आहे.
advertisement
सनी देओलने आपल्या कारकिर्दीत नेहमीच दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्रिदेव'मधील हा अतिशय रोमँटिक अंदाज प्रेक्षकांसाठी अनपेक्षित होता.
advertisement

माधुरीनेच उघड केलं सिक्रेट

या गाण्याच्या शूटिंगदरम्यान सनी देओलची झालेली अवस्था माधुरी दीक्षितने एका रिअॅलिटी शोमध्ये सांगितली होती. माधुरीने खुलासा केला, "जेव्हा आम्ही 'मैं तेरी मोहब्बत में पागल हो जाऊंगा...' या गाण्याचे शूटिंग करत होतो, तेव्हा सनीजी तर माझ्या डोळ्यात पाहतच नव्हते! सेटवर त्यांना वारंवार सांगितले जात होते की, त्यांनी हिरोईनच्या डोळ्यात बघायचे आहे, पण लाजून ते इकडेतिकडे बघत होते."
advertisement
माधुरी दीक्षितसोबत एवढा रोमँटिक सीन करताना सनी देओलची झालेली ही अवस्था, त्याच्या स्वभावातील साधेपणा दर्शवते. या लाजाळूपणामुळे सीनमध्ये थोडी अडचण आली असली तरी, त्यांची पडद्यावरील केमिस्ट्री आजही प्रेक्षकांना खूप आवडते आणि म्हणूनच हे गाणे आजही इतके लोकप्रिय आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचं ब्लॉकबस्टर गाणं, सनी देओलसोबत केला भरभरून रोमान्स, लाजून गुलाबी झाला होता अभिनेता
Next Article
advertisement
Supreme Court On Local Body Election : आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आदेश...
आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व
  • आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व

  • आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व

  • आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व

View All
advertisement