advertisement

Health Tips : त्वचेची समस्या होईल दूर, हिवाळ्यात आहारात समावेश करा काळे मनुके, हे आहेत आणखी फायदे

Last Updated:

हिवाळ्यात काळे मनुके आहारात घेतल्यास केस गळती आणि त्वचेच्या समस्या देखील दूर होतात. तसेच ॲनिमियाची समस्या दूर होण्यापासून ते वजन कमी करण्यासाठी देखील काळे मनुके फायदेशीर आहेत. 

+
Health

Health Tips 

अमरावती : काळे मनुके अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. त्यात लोह, फायबर, कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट्स, तसेच नैसर्गिक साखर असते. त्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. हिवाळ्यात काळे मनुके आहारात घेतल्यास केस गळती आणि त्वचेच्या समस्या देखील दूर होतात. तसेच ॲनिमियाची समस्या दूर होण्यापासून ते वजन कमी करण्यासाठी देखील काळे मनुके फायदेशीर आहेत. जाणून घेऊ, काळे मनुके खाण्याचे आणखी काय फायदे आहेत.
1. हिवाळ्यात काळे मनुके आहारात घेतल्यास शरीराला नैसर्गिक उष्णता मिळते. काळ्या मनुकांमध्ये नैसर्गिक उष्ण गुणधर्म असतात. त्यामुळे हिवाळ्यात थंडीपासून शरीराचे संरक्षण होते.
2. काळे मनुके आहारात घेतल्यास रक्तवाढ होऊन ॲनिमियाची समस्या दूर होते. काळ्या मनुकांत लोह मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हे हिमोग्लोबिन वाढवायला मदत करतात.
advertisement
3. तसेच पचनशक्ती सुधारण्यास देखील मदत करते. मनुकांमध्ये असलेले फायबर पचन सुधारते, बद्धकोष्ठता कमी करते आणि पोट साफ होण्यास मदत करते.
4. काळे मनुके त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेत. काळ्या मनुकांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स व व्हिटॅमिन C त्वचा चमकदार ठेवतात. पिंपल्स कमी करतात, तसेच केसांना पोषण देतात.
5. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळे मनुके हृदयाचे आरोग्य सुधारतात. हे वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी करून चांगले कोलेस्टेरॉल (HDL) वाढवण्यास मदत करतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
advertisement
6. काळे मनुके हाडांसाठी उत्तम आहेत. काळ्या मनुकांमध्ये कॅल्शियम, बोरॉन आणि मॅग्नेशियम असते. जे हाडे मजबूत ठेवतात आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात.
7. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासही मदत करते. अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक व्हिटॅमिन्समुळे शरीराची इम्युनिटी वाढते व विविध संसर्गांपासून बचाव होतो.
8. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी देखील काळे मनुके फायदेशीर ठरतात. मनुके नैसर्गिक एनर्जी बूस्टर आहेत. मध्यम प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढत नाही, उलट भूक नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते.
advertisement
9. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मनुकांमध्ये असलेले पोटॅशियम शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित ठेवते, ज्यामुळे BP नियंत्रित राहतो.
काळे मनुके कसे खावेत?
6-8 काळे मनुके रात्री पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी ते मनुके खाणे सर्वोत्तम मानले जाते. दररोज थोड्या प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकते. काळे मनुके खाण्याचे अनेक फायदे आहेत. तरीही अति प्रमाणात सेवन करू नये. शुगर किंवा आणखी काही त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सकाळी काळे मनुके खावेत.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : त्वचेची समस्या होईल दूर, हिवाळ्यात आहारात समावेश करा काळे मनुके, हे आहेत आणखी फायदे
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement