बीडमध्ये अजित पवार रामकृष्ण हरी म्हटले, तुतारी आणि घड्याळाची ओपन युती, सोनवणेंच्या वक्तव्याने खळबळ
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
बीडमध्ये तुतारी आणि घड्याळाची ओपन युती असल्याचे वक्तव्य खासदार बजरंग सोनवणे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड : बीडमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणात रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर आता खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे. बीडमध्ये आमची छुपी नाही तर ओपन युती आहे, असे बजरंग सोनवणे म्हणाले.
बीड नगर परिषदेच्या निमित्ताने अजित पवार यांची शहरात जाहीर सभा झाली. यावेळी अजित पवार यांनी जाहीर भाषणात रामकृष्ण हरी म्हटले. त्यांच्या याच घोषणेची सर्वाधिक चर्चा झाली. त्यांच्या म्हणण्याचा रोख किंवा अर्थ काय होता, याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली.
अंबाजोगाईत आघाडी, बीडमध्येही आमची युती
अंबाजोगाई नगर परिषदेत देखील आम्ही आघाडी करून एकत्रित लढत आहोत. त्यामुळे बीडमध्ये छुपी नाही तर दोन्ही राष्ट्रवादीची ओपन युती असल्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून निवडणुकीनंतर ओपन युतीचा एकत्रिकरणाचा पुढचा टप्पा असेल का, असे विचारले जाऊ लागले आहे.
advertisement
दोन्ही राष्ट्रवादीची ओपन युती, आम्ही नाकारत नाही-बजरंग सोनवणे
बीडच्या सभेत अजित पवार यांनी रामकृष्ण हरी म्हटले. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ तुतारीला मतदान करा, असाच होता. त्यांनी जाहीरपणे मतदारांना तुतारीला मतदान करण्याचे आवाहन केले. एमआयएमने आमच्यावर आरोप केला की दोन्ही राष्ट्रवादीची छुपी युती आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की आमची छुपी युती नाही, आमची उघडपणे युती आहे. आम्हाला छुपी युती करण्याची काही गरज नाही. आम्ही छुप्या पद्धतीने काही करत नाही. आमची युती आहे तर आहे. आंबेजोगाईमध्ये आमच्या दोन्ही पक्षांची माणसे एकमेकांसोबत आहेत. बीडमध्ये सुद्धा युती आहे का, असे विचारले असता, होय, आमची युती बीडमध्ये सुद्धा आहे. अजित पवार म्हणजेच नेत्यानेच उघडपणे रामकृष्ण हरी म्हटल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे बजरंग सोनवणे म्हणाले.
view commentsLocation :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
November 28, 2025 2:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बीडमध्ये अजित पवार रामकृष्ण हरी म्हटले, तुतारी आणि घड्याळाची ओपन युती, सोनवणेंच्या वक्तव्याने खळबळ


