धनश्रीशी घटस्फोटानंतर चहलची लगीनघाई, सोशल मीडियावर केली मोठी घोषणा; म्हणतो 'लग्नासाठी तयार आहे, फक्त...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Yuzvendra Chahal: धनश्री आणि चहल यांनी घटस्फोट घेऊन आपले मार्ग वेगळे केले. या ब्रेकअपनंतर आता चहलने आपले पुन्हा एकदा घर वसविण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.
मुंबई: भारतीय क्रिकेट टीमचा फिरकीपटू आणि धनश्री वर्माचा एक्स-हजबंड युजवेंद्र चहल सध्या सोशल मीडियावर तुफान ॲक्टिव्ह आहे. २२ डिसेंबर २०२० रोजी लग्न केल्यानंतर अवघ्या पाच वर्षांतच धनश्री आणि चहल यांनी घटस्फोट घेऊन आपले मार्ग वेगळे केले. या ब्रेकअपनंतर आता चहलने आपले पुन्हा एकदा घर वसविण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक मनोरंजक घोषणा केली आहे, ज्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
चहलचा डॅशिंग लूक आणि कॅप्शन
युजवेंद्र चहलने इन्स्टाग्रामवर आपले काही डॅशिंग आणि स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. हे फोटो आणि त्याला दिलेले कॅप्शन सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये चहलने काळ्या रंगाचा ब्लेझर आणि पँट परिधान केली आहे, ज्यामुळे त्याचा लूक खूपच हँडसम आणि आकर्षक दिसत आहे. त्याने मॅचिंग फॉर्मल शूजही घातले आहेत. कधी सोफ्यावर बसून, तर कधी उभे राहून, चहलने एकापेक्षा एक उत्तम पोज दिल्या आहेत. त्याचा हा 'स्वॅग' चाहत्यांना खूप आवडला आहे.
advertisement
मात्र, या फोटोंपेक्षा जास्त चर्चा त्याच्या कॅप्शनची होत आहे. चहलने कॅप्शनमध्ये लिहिले, "शादी के लिए तैयार हूं, बस एक लड़की चाहिए!" सोबत त्याने काही मजेशीर आणि हसणारे इमोजीही जोडले आहेत.
advertisement
चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पूर
चहलची ही पोस्ट म्हणजे गंमत आहे की, त्याने खरंच लग्नासाठी 'शोध' सुरू केला आहे, याबद्दल आता चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. घटस्फोटानंतर चहलने पुन्हा एकदा लग्न करण्याची तयारी सुरू केली असावी, असा अंदाज अनेक चाहते व्यक्त करत आहेत. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये त्याला 'पोरगी शोधायला मदत' करण्याची तयारी दर्शवली आहे. युजवेंद्र चहलने विनोदी पद्धतीने ही पोस्ट केली असली, तरी यातून त्याने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे स्पष्ट होत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2025 9:36 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
धनश्रीशी घटस्फोटानंतर चहलची लगीनघाई, सोशल मीडियावर केली मोठी घोषणा; म्हणतो 'लग्नासाठी तयार आहे, फक्त...'


