YouTuber व्हिडीओवर 10 हजार Views झाले तर किती कमाई करतो? संपूर्ण गणित समजून घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हा प्रश्न सोपा वाटतो, पण प्रत्यक्षात त्याचे उत्तर थोडे गुंतागुंतीचे आहे. कारण YouTube ची कमाई काही ठराविक गोष्टींवर अवलंबून असते.
मुंबई : आपल्याला कोणत्याही गोष्टीची माहिती पाहिजे असेल तर आपण सर्वात आधी युट्यूबर जातो. तिथे एखाद्या गोष्टीची माहिती. काय कसं बनवायचं ही सगळी माहिती मिळते. शिवाय टेक्निकल गोष्टींसह मनोरंजन देखील युट्यूबर होतं. आजच्या डिजिटल युगात YouTube हा केवळ मनोरंजनाचा प्लॅटफॉर्म राहिलेला नाही, तर तो पूर्णवेळ करिअर बनवण्यासाठी लाखो लोकांचा पहिला पर्याय झाला आहे.
मोबाईलमध्ये कॅमेरा असला की कुणीही व्हिडिओ बनवू शकतो, अपलोड करू शकतो आणि चांगले व्यूज मिळाले की त्यातून पैसेही कमवू शकतो. ही गोष्ट कोविडनंतर लोकांना हळूहळू समजू लागली आणि त्यातून पैसे मिळत असल्यामुळे लोक त्याकडे करिअर म्हणून पाहू लागले आहेत. पण आता बहुतेक नवीन क्रिएटर्सच्या मनात एकच प्रश्न फिरत असतो “खरंच YouTube वर व्हिडीओ टाकला किंवा व्हायरल झाला तर किती पैसे मिळत असतील? आणि 10,000 views ला किती कमाई होत असेल?”
advertisement
हा प्रश्न सोपा वाटतो, पण प्रत्यक्षात त्याचे उत्तर थोडे गुंतागुंतीचे आहे. कारण YouTube ची कमाई काही ठराविक गोष्टींवर अवलंबून असते.
YouTube पैसे देतो नेमके कुठून?
YouTube वर पैसे येतात मुख्यत्वे AdSense मधून म्हणजेच तुमच्या व्हिडिओवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमधून, म्हणजे तुमच्या व्हिडिओवर जाहिरात चालली आणि प्रेक्षकांनी ती स्किप केली नाही किंवा एखाद्याने ती जाहिरात क्लिक केली, तर YouTube त्या जाहिरातदाराकडून पैसे घेतो आणि त्यातील 55% क्रिएटरला देतो, 45% YouTube स्वतःकडे ठेवतो.
advertisement
कमाई कशी ठरते? इथे कामी येतात दोन टर्म्स CPM आणि RPM
1) CPM – (Cost Per Mille)
1000 जाहिराती दाखवल्यावर जाहिरातदार किती पैसे देतो, याला CPM म्हणतात. हा आकडा देश, category आणि जाहिरातदाराच्या बजेटवर अवलंबून असतो.
सामान्यत Finance / Tech / Business साठी सर्वात जास्त CPM असतं, तर Vlogging / Entertainment साठी सर्वात कमी CPM मिळतं.
advertisement
2) RPM – (Revenue Per Mille)
1000 views वर क्रिएटरला प्रत्यक्ष किती पैसे मिळतात, हे RPM सांगते. यात YouTube ची कट, किती लोकांनी ad स्किप केली, क्लिक रेट, view duration… अशा गोष्टींचा समावेश असतो.
भारतामध्ये 10,000 Views साठी किती कमाई?
भारतामध्ये सरासरी RPM ₹20 ते ₹80 इतका असतो.
यावरून साधारण अंदाज लावला तर 10,000 views = ₹200 ते ₹800 (भारतामध्ये बहुतेक creators इतकेच कमावतात)
advertisement
पण जर तुमचा व्हिडिओ high-earning categoryमध्ये असेल म्हणजे Finance / Tech / Education Videos तर 10,000 views = ₹1500 कमाऊ शकता आणि entertainment किंवा vlog content मध्ये कमाई सर्वात कमी, बहुधा ₹150–₹400 च्या आसपास पैसे मिळतात.
कमाईवर मोठा प्रभाव टाकणारे घटक
प्रेक्षक भारताचे की परदेशातील याने खूप मोठा फरक पडतो. व्हिडिओ किती लांब आहे हे देखील महत्वाचं? (8+ मिनिटांच्या व्हिडिओत Mid-Roll Ads येतात), किती लोक ad skip करत नाहीत, व्हिडिओ कोणत्या niche मध्ये आहे, channel चे audience age group (25+ audience जास्त ads पाहते)
advertisement
YouTube कमाई स्थिर नसते; ती तुमच्या content type, audience आणि ad engagement वर अवलंबून असते. पण सुरुवातीसाठी 10,000 views वर ₹200–₹800 हे सर्वात वास्तव estimate आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2025 9:31 PM IST


