Alcohol Fact : लोक दारू कमी का पितायत? कारण ऐकाल तर आश्चर्य वाटेल…; नशेच्या ट्रेंडमध्ये मोठा बदल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आरोग्याबद्दल वाढती जागरूकता, आर्थिक ताण, कठोर नियम आणि सोशल हॅबिट्समधील बदलामुळे अनेकजण दारूचे सेवन कमी करत आहेत. एवढच नाही तर दारुची किंमत वाढल्यामुळे अनेक लोक दारुपासून दूर जाऊ लागले आहेत किंवा काहींनी त्याचं सेवन करणं कमी केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
कर्नाटकातील काही महिन्यांचे आकडे म्हणतात की दारूची विक्री सलग कमी होत आहे. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये एप्रिल–ऑक्टोबर दरम्यान 407 लाख केसवरून विक्री 403 लाख केस झाली. कर्नाटक लिकर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष लोकेश म्हणाले की "ड्यूटी दरवर्षी वाढते. ग्राहक महागाईमुळे दारू घेऊ शकत नाहीत." ते पुढे हे देखील म्हणाले की, "बीअरवरही टॅक्स वाढला आहे. तर लोक आता गांजा, चरसकडे वळत आहेत."
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


