'मुस्लीम करून तिच्यासोबत...', ऐश्वर्या रायबद्दल पाकिस्तानी मौलवीची घृणास्पद कमेंट, VIDEO मुळे इंटरनेटवर संताप

Last Updated:

Aishwarya Rai: एका पाकिस्तानी मौलवीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात त्याने ऐश्वर्यावर अत्यंत घृणास्पद आणि अपमानजनक टिप्पणी केली आहे.

News18
News18
मुंबई: बॉलिवूडची 'क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्याबद्दल पाकिस्तानमधून आलेल्या एका विधानाने सध्या भारतात वातावरण तापवले आहे. एका पाकिस्तानी मौलवीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात त्याने ऐश्वर्यावर अत्यंत घृणास्पद आणि अपमानजनक टिप्पणी केली आहे.

ऐश्वर्या रायशी लग्न करण्यासाठी मौलवीचा प्लॅन

हा संपूर्ण वाद ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या वैवाहिक जीवनात तणाव असून, त्यांच्यात घटस्फोट होणार असल्याच्या अफवांमुळे सुरू झाला होता. याच अफवेचा फायदा घेत एका पाकिस्तानी मौलवीने एका मुलाखतीदरम्यान आपला किळसवाणा प्लॅन उघड केला. कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता, हा मौलवी जाहीरपणे ऐश्वर्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करतो, पण त्यासाठी तिचे धर्म परिवर्तन करण्याची योजना सांगतो.
advertisement
तो व्हिडिओमध्ये म्हणतो, "पहिले ऐश्वर्या रायला मुस्लीम बनवा, मग निकाह करू. ऐश्वर्या रायपेक्षा जास्त सुंदर नाव 'आएशा राय' असं ठेवू, मजा येईल." तो स्वतःला 'मुफ्ती साहब' म्हणवून घेतो आणि पुढे हसत म्हणतो, "अल्लाहकडून येणाऱ्या प्रत्येक देणगीसाठी तयार राहणे, हेच माझ्या इस्लामचे सौंदर्य आहे."
advertisement

राखी सावंतचा घेतला आधार

मुलाखत घेणाऱ्याने, "मुफ्ती साहब, तुम्ही गैर-मुस्लिमशी कसे लग्न करू शकता?" असा प्रश्न विचारताच मौलानाने राखी सावंतचा उल्लेख करून विषयावरून पळ काढला. तो हसत उत्तर देतो, "ओ हो... ही जी आमची राखी सावंत आहे, तिचे नाव आता फातिमा आहे." अशा प्रकारे त्याने वादग्रस्त अभिनेत्री राखी सावंतचा उल्लेख करत भारतीय कलाकारांची थट्टा करण्याचा प्रयत्न केला आहे.
advertisement
advertisement

चाहत्यांच्या संतापाचा उद्रेक

हा अपमानजनक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरला असून तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. त्यावर भारतीय चाहत्यांनी तीव्र टीका केली आहे. एका यूजरने आपला राग व्यक्त करत म्हटले, "आणि याच्यासाठी ती मुस्लिम होईल? काहीही बोलतात हे लोक." तर दुसऱ्याने "खबीसची शक्ल आहे याची, लाज बाळगा," अशा कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. एका चाहत्याने गमतीने म्हटले, "आता सलमान भाईला सांगतो, बघतो काय होतंय." मौलवीचे हे विधान पाकिस्तानमधील काही वर्गाची संस्कृती आणि मानसिक मागासलेपण दर्शवत असल्याचा आरोप अनेक भारतीय युजर्सनी केला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मुस्लीम करून तिच्यासोबत...', ऐश्वर्या रायबद्दल पाकिस्तानी मौलवीची घृणास्पद कमेंट, VIDEO मुळे इंटरनेटवर संताप
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement