बिग बॉस म्हणाले, "अनुश्री प्राजक्ता आपण हसताय हे वागणं शोभत नाही आपल्याला. मला कोणतंही स्पष्टीकरण नकोय. समोर एक व्यक्ती रडतेय. तिला प्रचंड त्रास होतोय. थोडी माणूसकी दाखवा, सहानुभूती ठेवा. हेच जर राखी यांनी केलं असतं तर संपूर्ण घर पेटून उठलं असतं." दोघींनी बिग बॉसना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पण बिग बॉसने कोणाचंही ऐकून घेतलं नाही. ते म्हणाले, "एवढंच सांगेन की, माणूसकी नसेल तर इथून उठून जाऊ शकता."
advertisement
राखी बाहेर आल्यानंतर आणि टास्क संपल्यानंतक अनुश्री आणि प्राजक्ता यांनी राखीला सगळं एक्सप्लेन केलं. अनुश्री म्हणाली, "राखी सीन काय झाला माहितीये, जेव्हा तू गेली ना, मी तुला कधीच असं इमॅजिन केलं नाही की स्वप्नात कधी तुला पाहू शकते." राखी म्हणाली, "मी देखील मनुष्य आहे, मलासुद्धा पेन आहे. आईचं बाबाचं." अनुश्री म्हणाली, "तू सगळं जेव्हा एक्सप्रेस करत होतीस तेव्हा मला सगळं आवरलं नाही. म्हणून मी वॉशरूममध्ये गेले नंतर मी बाहेर आले."
प्राजक्ता म्हणाली, "मी सांगते काय झालं, ट्रॅजिक सिच्युएशनमध्ये, तुझ्या ट्रॅजिक सिच्युएशनमध्ये तू हसवते. तुझ्या डोळ्याचे लॅश खाली आलेले पाहून तिला हसायला आलं." अनुश्रीनं राखीची माफी मागितली. अनुश्री म्हणाली, "सो सॉरी, माझं असं बिल्कुल इंटेशन नव्हतं. मी तुझ्या इमोशन्सचा खूप रिस्पेक्ट करते." यावर राखी म्हणाली, "कहता जोकर सारा जमाना, आधी हकीकत आधा फसाना. शो मस्ट गो ऑन." अनुश्री म्हणाली, "हो तेच झालं."
राखी कन्फेशन रूममध्ये रडत असताना तिचा तिच्यावरचा कंट्रोल सुटला. या सगळ्यात तिने डोळ्यांना लावलेल्या नॅशेस निघाल्या आणि चेहऱ्यावर चिकटल्या. हे पाहून अनुश्रीला हसू आलं. पण तिने राखीची माफी मागितली आणि राखीनं देखील तिला माफ केल्याचं दिसून आलं.
