TRENDING:

BBM 6 : अनुश्रीला 'भाऊचा धक्का'! प्राजक्तावर दादागिरी महागात; रितेश भाऊने दिला दणका

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 : प्राजक्ता शुक्रेसोबत भांडताना शिवीगाळ करणाऱ्या आणि नको नको ते बोलणाऱ्या अनुश्रीला रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावर चांगलाच धक्का दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉसच्या घरात कामाच्या वाटपावरून नेहमीच वाद होत असतात. मात्र यंदा हे वाद टोकाला गेले आहेत. राकेश बापटसोबतच्या वादानंतर अनुश्रीने प्राजक्ता शुक्रेसोबत वाद घातला आणि आता हाच वाद तिला चांगलाच महागात पडला आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी तिला चांगलाच दणका दिला आहे.
News18
News18
advertisement

प्राजक्ता आणि अनुश्री एकमेकींवर कडक शब्दात टीका करताना दिसले, अनुश्रीचे म्हणणं आहे, "आम्ही ड्युटी नाही करणार," अशा भूमिकेपासून सुरू झाले हा वाद. त्यावर प्राजक्ता म्हणाली, काय 'मूर्ख आहे यार... आणि त्यावर अनुश्री म्हणाली, 'हो मूर्ख आहे आम्ही, तुझ्यासारखे'.

Mumbai Crime : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता मध्यरात्री पोलिसांच्या ताब्यात, ओशिवारा गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट!

advertisement

गार्डन एरियामध्ये झालेल्या भांडणांनंतर प्राजक्ताने हे सगळं दिपालीला जाऊन सांगितलं. अनुश्रीने शिव्या दिल्या असं ती सांगते. यानंतर दिपाली प्राजक्ताला याचा जाब विचारायला येते, काय गं तू शिव्या देतेस? त्यावर अनुश्री म्हणाली, आईला घेऊन आलीस तू ? प्राजक्ता म्हणाली, अक्कल आहे का तुला? बावळट...

इतकंच नाही तर, वादाच्या ओघात काही अश्या गोष्टी बोलल्या गेल्या ज्यमुळे घरातील वातावरण अधिकच तापलं आहे. इतकं की रितेश भाऊही भडकले. रितेश भाऊंनी तिला चांगलंच झापलं आहे.

advertisement

रितेश म्हणाला, अनुश्री मला सांगा जेव्हा प्राजक्ता दिपालीला घेऊन आल्या तेव्हा तुम्ही काय म्हणालात आईला घेऊन आलीस, जा आता बाबाला घेऊन ये. ए लक्ष इथं! भावाला आणलंय. सांगा आता काय सांगणार"

'हे बिग बॉसचं घर आहे, मस्तीत नाही शिस्तीत राहायचं', अशी तंबीच रितेशने अनुश्रीला दिली आहे. 24 जानेवारीच्या भाऊचा धक्काच्या प्रोमोमध्ये रितेश अनुश्रीला दणका देताना दिसला आहे.

advertisement

स्मृतीच्या मैत्रिणीचा आरोप, बेडवर रंगेहात पकडलं! पलाश मुच्छलने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला 'सांगलीत माझ्यावर...'

याआधी अनुश्रीचं राकेश बापटबरोबर देखील भांडण झालं. राकेशने मला न विचारता हात लावला यावरून तिने घरात धिंगाणा घातला. अनुश्रीने थेट राकेशच्या कॅरेक्टरवर डाऊट घेतला. त्यानंतर घरातील सगळे अनुश्रीच्या विरोधात गेले आहेत आणि आता अनुश्रीने प्राजक्ताला शिव्या दिल्यानंतर सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तापलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
म्हणून सायकल घेऊन निघालो, पुण्याच्या सायकल टूरमध्ये एंट्री करणारे आप्पा आले समोर
सर्व पहा

नेटकऱ्यांनी अनुश्रीला घरातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. एका युझरनं लिहिलंय, "हाकला रे हिला घरा बाहेर". दुसऱ्याने लिहिलंय, "अनुश्री माने कुठे ही छपली माने कुठे." तिसऱ्याने लिहिलंय, "या आठवड्यात अनुश्रीला पाहताना असं वाटतंय की तिचा अहंकार खूपच वाढलाय. बोलण्याची भाषा तर एकदमच विचित्र आणि खालच्या पातळीची झाली आहे." आणखी एकाने लिहिलंय, "अनुश्री माने या आठवड्यात बाहेर जाणार."

मराठी बातम्या/मनोरंजन/
BBM 6 : अनुश्रीला 'भाऊचा धक्का'! प्राजक्तावर दादागिरी महागात; रितेश भाऊने दिला दणका
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल