हर्षवर्धन वावरे आणि बेला शेंडे यांनी गायलेलं हे गाणं लगेचच मनात घर करतं. त्यांच्या गोड आणि भावस्पर्शी आवाजाने या गाण्याला एक वेगळीच जादू दिली आहे. संजय अमर आणि संजन पटेल यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत, तर संजन पटेल आणि अमेय नरे यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. गाण्याच्या प्रत्येक ओळीत प्रेमाची एक गोड अस्वस्थता आणि एका नव्या नात्याची सुंदर चाहूल जाणवते.
advertisement
या गाण्याबद्दल बोलताना दिग्दर्शक संजय अमर म्हणाले, "प्रेमाची भावना कधी कळते, तर कधी नकळत मनात येते. 'ना कळले कधी तुला' हे गाणं अशाच नकळत सुरू झालेल्या प्रेमाचं सुंदर रूप आहे. सुबोध आणि प्रार्थनाच्या डोळ्यातून हे प्रेम फुलताना पाहणं, हा प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव असेल."
२२ ऑगस्टला चित्रपट होणार प्रदर्शित
'बेटर-हाफची लव्हस्टोरी' हा चित्रपट २२ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनीच केलं आहे. या चित्रपटात सुबोध भावे, प्रार्थना बेहरे यांच्यासोबतच अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात प्रेम आणि दुरावा यांचा उत्तम संगम पाहायला मिळणार आहे.