खेरवाडी, खेरनगर... अनुपम खेर यांनी सांगितला मुंबईतला पहिला पत्ता, म्हणाले 'जगातील कोणतीही ताकद मला...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Anupam Kher Received Raj Kapoor Lifetime Achievement Award : अनुपम खेर यांना 'स्व. राज कपूर जीवन गौरव' पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगितली, जी भावूक करणारी होती.
advertisement
advertisement
advertisement
ते पुढे म्हणाले, "त्यावेळी मी एका चाळीत छोट्याशा खोलीत राहत होतो. आम्ही पाचजण त्या खोलीत राहत होतो. मला माझ्या चाळीचा पत्ताही नीट माहित नव्हता. मला अजिबात असं वाटत नव्हतं की माझं भविष्यात काही होईल. त्यावेळी टॅलेंटपेक्षा हेअरस्टाईलला जास्त महत्त्व होतं." त्यांच्या या बोलण्याने उपस्थितांना हसू आवरता आलं नाही.
advertisement
त्यानंतर अनुपम खेर यांनी त्यांच्या मुंबईतील पहिल्या दिवसांची आठवण सांगितली. ते म्हणाले, "माझ्या घरमालकाच्या मुलाने मला घराचा पत्ता लिहून दिला. तो पत्ता वाचताच मी ठरवलं की जगातील कोणतीही ताकद मला यशस्वी होण्यापासून अडवू शकत नाही. माझा मुंबईतील पहिला पत्ता होता, अनुपम खेर, 2/15, खेरवाडी, खेरनगर, खेर रोड, बांद्रा इस्ट! तेव्हा मला हे नाव ऐकून खूप आनंद झाला."
advertisement
advertisement