नवऱ्याच्या मृत्यूनंतर टाइम्स ऑफ इंडियाने शुभांगीशी संपर्क साधला असता, "तुमचे विचार माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत… पण कृपया मला थोडा वेळ द्या", अशी प्रतिक्रिया तिनं दिली.
शुभांगी आणि पियुष यांनी 2003 मध्ये लग्न केलं होतं. एकमेकांचा हात धरून त्यांनी तब्बल 22 वर्ष एकत्र संसार केला. पण त्यांच्या नात्यात दुरावा आला. फेब्रुवारी 2025 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. दोघांना एशी नावाची मुलगी आहे.
advertisement
काही दिवसांपूर्वीच शुभांगीने एका मुलाखतीत घटस्फोटाबाबत बोलताना सांगितलं होतं, "हे खूप वेदनादायक होतं. मी त्या नात्यात पूर्णपणे गुंतले होते. पण नंतर अंतर वाढत गेलं आणि शेवटी मी त्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता माझ्यावरचा भार उतरल्यासारखं वाटतं. माझं पूर्ण लक्ष माझ्या मुलीकडे आहे. मी तिला सुरक्षित, आनंदी बालपण द्यायचं ठरवलंय." शुभांगीचा नवरा पियुष व्यवसायाने डिजिटल मार्केटिंगमध्ये होता. शांत, आपल्या विश्वात रमणारा माणूस होता.