"मुलगा झाला तर आम्ही पुन्हा एकदा…"
हर्षच्या या वक्तव्यावर सोनाली आश्चर्यचकित झाल्यावर हर्ष पुढे म्हणाला,"तीन हा माझा लकी नंबर आहे". त्यानंतर भारतीने सविस्तर सांगितलं,"हा म्हणतो आम्ही थांबणार नाही. आम्हाला मुलगी हवी आहे, म्हणून आम्ही ठरवलं की यावेळीही मुलगा झाला तर पुन्हा एकदा प्रयत्न करू. मग मी त्याला विचारलं, तिसरं बाळही मुलगाच झाला तर? तर तो म्हणाला, आपण पुन्हा प्रयत्न करू".
advertisement
हर्ष पुढे म्हणाला,"मुलगी असो किंवा मुलगा, सुरुवातीला आम्ही ठरवलं होतं की दुसरं मूल होणार नाही. पण जर हेही मुलगाच झाला, तरी मला मुलगीच हवी आहे.”
भारतीने हर्षसोबत 2017 मध्ये काही काळ डेटिंग केल्यानंतर हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केलं. 3 एप्रिल 2022 रोजी या जोडप्याने त्यांच्या मुलाचे, लक्ष (लाडाने ‘गोला’) स्वागत केलं. यावर्षी ऑक्टोबरमध्ये भारती आणि हर्षने इंस्टाग्रामवर त्यांच्या दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती.
भारती सिंग सध्या ‘लाफ्टर शेफ्स’ या कुकिंग शोचा तिसरा सीझन होस्ट करत आहे. या शोमध्ये अली गोनी, एल्विश यादव, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, अभिषेक कुमार, कृष्णा अभिषेक, जन्नत जुबैर, गुरमीत चौधरी, देबिना बॅनर्जी आणि विवियन डीसेना यांसारखे अनेक सेलिब्रिटी शेफ सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे, हर्ष ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ चा 11वा सीझन होस्ट करत आहे. या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू, शिल्पा शेट्टी आणि शान हे जज आहेत आणि हा शो SonyLIV वर स्ट्रीम केला जात आहे.
