या चित्रपटाला रामायणाची पार्श्वभूमी देण्यात आली आहे. त्यानुसार चित्रपटातील एका सीनमध्ये भगवान राम, सीता आणि हनुमानला सिंघम, अवनी आणि सिंबा यांच्या रूपात दाखवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्या दृश्यात सिंघम आणि श्रीराम यांच्या पायाला स्पर्श होतो ते दृश्यही बदलण्यास सांगितले आहे.
चित्रपटातील अनेक सीन कट करण्यात आले आहेत. सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना १६ सेकंदांचा सीन कापण्यास सांगितले असून यामध्ये रावण माता सीतेला धरून ओढत आहे. 29 सेकंदाच्या सीनमध्ये हनुमान ईर्ष्यावान आणि सिंबाला फ्लर्ट करताना दाखवले आहे. हा सीनही काढून टाकण्यास सांगितले आहे.
advertisement
'पुष्पा 2' ने अल्लू अर्जुनला केलं मालामाल, जुहूमध्ये 5 बंगले घेईल एवढं मिळालं मानधन
चित्रपटात चार ठिकाणी झुबेर नावाच्या पात्राचे डायलॉग बदलण्यात आले आहेत. तसेच, करीना कपूरच्या काही दृश्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. इतकंच नाही, तर सेन्सॉर बोर्डाने 26 मिनिटांचा संवाद आणि सीनही बदलला आहे. या सीनमुळे भारताच्या इतर देशांसोबतच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर पोलिस ठाण्यात कुणाचा शिरच्छेद केल्याचे दृश्य डिलीट करण्यात आले आहे.
सेन्सॉर बोर्डानेही निर्मात्यांना चित्रपटाच्या सुरुवातीला डिस्क्लेमर टाकण्यास सांगितले आहे. त्यावर लिहिले जाईल, "हा चित्रपट पूर्णपणे काल्पनिक आहे. चित्रपटाची कथा जरी प्रभू रामापासून प्रेरित असली तरी या चित्रपटातील एकाही पात्राला देवाच्या रूपात पाहिले जाऊ नये. आजच्या जगातील लोक... समाज, त्यांची संस्कृती, परंपरा या कथेत दाखवल्या आहेत." हा डिस्क्लेमर स्क्रीनवर 1 मिनिट 19 सेकंदांसाठी दाखवला जाईल.