'पुष्पा 2' ने अल्लू अर्जुनला केलं मालामाल, जुहूमध्ये 5 बंगले घेईल एवढं मिळालं मानधन

Last Updated:

अल्लू अर्जुनने “पुष्पा”साठी मानधनाच्या बाबतीत दाक्षिणात्य सुपरस्टार विजय आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला मागे टाकल्याची चर्चा आहे.

अल्लू अर्जुनने “पुष्पा”साठी मानधनाच्या बाबतीत दाक्षिणात्य सुपरस्टार विजय आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला मागे टाकल्याची चर्चा आहे.
अल्लू अर्जुनने “पुष्पा”साठी मानधनाच्या बाबतीत दाक्षिणात्य सुपरस्टार विजय आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला मागे टाकल्याची चर्चा आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा विस्तार मोठा आहे. बॉलिवूडप्रमाणेच टॉलिवूडमध्येही चित्रपट निर्मितीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. गेल्या काही वर्षांत अनेक टॉलिवूड चित्रपट देशाविदेशात सुपरहिट ठरले आहेत. बॉलिवूड सेलेब्रिटीजप्रमाणे टॉलिवूडमधील अभिनेते, अभिनेत्रींना लोकप्रियता मिळताना दिसते. टॉलिवूडचा सुपरस्टार अल्लू अर्जुन “पुष्पा” या चित्रपटामुळे रातोरात प्रकाशझोतात आला. लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित होत आहे. मानधनाच्या बाबतीत दाक्षिणात्य सुपरस्टार विजय आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला मागे टाकल्याची चर्चा आहे.
नॅशनल अ‍ॅवॉर्ड विजेता टॉलिवूड अभिनेता अल्लू अर्जुन आता “पुष्पा 2” अर्थात “पुष्पा : द रूल” या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सुकुमारने हा चित्रपट दिग्दर्शित केला असून तो 6 डिसेंबरला रिलीज होत आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट सहा भाषांत प्रदर्शित होईल.
OMG! दिलजीत दोसांझने फॅनला दिलं महागडं जॅकेट? किंमत इतकी, जितका तुमचा महिन्याचा पगारही नसेल
“ट्रॅक टॉलिवूड”च्या वृत्तानुसार, या आगामी चित्रपटातील पुष्पा राजच्या भूमिकेसाठी अल्लू अर्जुनने 300 कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे. ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, पहिल्या भागात या भूमिकेला मिळालेले यश पाहता अल्लूने त्याचे मानधन वाढवले आहे. या वेळी या चित्रपटाकडून तसेच अल्लूकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. तसेच सिक्वल जास्त प्रभावी असेल, असं देखील त्यांना वाटतं. तसेच जागतिक बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट असंख्य रेकॉर्ड मोडेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
advertisement
“पुष्पा : द रूल”मध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंधाना अनुक्रमे पुष्पा राज आणि श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसतील. तसेच फहाद फॉसिल हा कलाकार जबरदस्त एसपी भंवर सिंह म्हणून पडद्यावर झळकेल. सुकुमार दिग्दर्शित या सिक्वलमध्ये ॲक्शन आणि ड्रामा असून तस्करीच्या अंधाऱ्या दुनियेचे चित्रण पाहायला मिळेल. देवी श्री प्रसाद पुन्हा एकदा श्रवणीय संगीताच्या माध्यमातून चित्रपटाला वेगळी ऊर्जा देत आहे.
advertisement
दरम्यान, यापूर्वी एच विनोथने दिग्दर्शित केलेल्या “थलपती 69” साठी अभिनेता विजयला 275 कोटी रुपये मानधन मिळाल्याचे सांगण्यात आले. 250 कोटी रुपये मानधन घेणाऱ्या शाहरुख खानला मागे टाकत तो सर्वाधिक कमाई करणारा भारतीय अभिनेता ठरला. पण अल्लू अर्जुनने “पुष्पा 2” साठी 300 कोटी रुपये मानधन घेत विजयचा विक्रम मोडला आहे. तथापि, “पुष्पा 2” च्या निर्मात्यांनी अधिकृतपणे अल्लू अर्जुनने बहुप्रतिक्षित सिक्वलसाठी नेमका किती मोबदला घेतला आहे, याचा खुलासा केलेला नाही.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'पुष्पा 2' ने अल्लू अर्जुनला केलं मालामाल, जुहूमध्ये 5 बंगले घेईल एवढं मिळालं मानधन
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement