OMG! दिलजीत दोसांझने फॅनला दिलं महागडं जॅकेट? किंमत इतकी, जितका तुमचा महिन्याचा पगारही नसेल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
बहुतेक वेळा दिलजीत चाहत्यांना त्याचं जॅकेट भेट देताना दिसतो. दिल्लीमध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्येही त्यानं एका चाहतीला जॅकेट भेट दिलं. त्याची किंमत काय होती?
संगीतक्षेत्रात सध्या दिलजीत दोसांज नावाची तरुणाईला भुरळ पडली आहे. त्याच्या कॉन्सर्ट्सना देशातच नाही तर परदेशातही खूप गर्दी होते. त्याच्या कॉन्सर्टमध्ये तो चाहत्यांशी बोलतो, इतकंच नाही तर त्यांना काही ना काही भेटही देतो. बहुतेक वेळा दिलजीत चाहत्यांना त्याचं जॅकेट भेट देताना दिसतो. दिल्लीमध्ये काल (27 ऑक्टोबर) झालेल्या कॉन्सर्टमध्येही त्यानं एका चाहतीला जॅकेट भेट दिलं. त्याची किंमत काय होती जाणून घ्या.
गायक, संगीतकार, अभिनेता, निर्माता दिलजीत दोसांजची सध्या ‘दिल-लुमिनाती’ टूर सुरू आहे. त्याअंतर्गत त्यानं नवी दिल्लीमध्ये लागोपाठ दोन कॉन्सर्ट्स केले. त्या कॉन्सर्ट्सची तिकिटं मिळवण्यासाठी चाहत्यांनी खूप गर्दी केली होती. दिलजीतचे चाहते जगभरात आहेत. भारतात तर त्याचे चाहते कॉन्सर्टची वाटच पाहत असतात. दिल्लीतल्या कॉन्सर्टच्या तिकिटांसाठी चाहत्यांनी लांबचलांब रांगा लावलेल्या दिसून आल्या. शो वेळेत सुरू न होऊनही चाहत्यांनी दिल्लीच्या उकाड्यात स्टेडियममध्ये बसून शो सुरू होण्याची वाट पाहिली.
advertisement
पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतून सुरुवात केलेल्या दिलजीत दोसांजनं या क्षेत्रात खूप लोकप्रियता मिळवली. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये हजारो चाहत्यांसमोर दिलजीतनं परफॉर्म केलं. महिन्याभरापासून लोक त्यासाठी वाट पाहत होते. त्यामुळे लोकांनीही त्याला दाद दिली. दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये तो चाहत्यांची मनं जिंकतो. लोकांशी बोलतो, सगळ्यांचे आभारही मानतो. त्याचं हे वागणं चाहत्यांच्या मनावर छाप पाडतं. सोशल मीडियावरही त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
advertisement
याच कॉन्सर्टमध्ये दिलजीतनं एका चाहतीला स्वतःचं जॅकेट भेट दिलं. खरं तर दिलजीत नेहमीच तसं करतो. कॉन्सर्टदरम्यान तो एखाद्या चाहत्याला जॅकेट भेट देतो. त्यामुळे यंदाच्या कॉन्सर्टमध्ये दिलजीतनं भेट दिल्यामुळे त्याची चाहती खूपच भावूक झाली. तिच्यासोबत आलेला एक मुलगा तर ते पाहून रडूच लागला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
advertisement
दिलजीतच्या या भेटीमुळे सोशल मीडियावरही त्याचे चाहते खूप प्रभावित झाले आहेत. दिलजीतनं भेट दिलेल्या जॅकेटची नेमकी किती किंमत असेल असे तर्क आता त्याचे चाहते लावत आहेत. खरं तर त्याची किंमत सांगता येऊ शकत नाही, पण ते जॅकेट महागडं असेल हे नक्की. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये दिलजीत दोसांजनं एकदा सांगितलं होतं की तो परदेशी ब्रँडचे कपडे वापरतो. त्याची किंमत 80 हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत असते. त्यामुळे दिलजीतनं चाहतीला भेट दिलेल्या त्या जॅकेटची किंमतही नक्कीच काही हजारांमध्ये तरी असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 29, 2024 8:29 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
OMG! दिलजीत दोसांझने फॅनला दिलं महागडं जॅकेट? किंमत इतकी, जितका तुमचा महिन्याचा पगारही नसेल