अभिनेत्री तेजस्वी प्रकाश 'सायको सैंया' या सीरिजमधून प्रसिद्ध भोजपूरी अभिनेते रवी किशन यांच्यासोबत रोमान्स करणार आहेत. त्याच्या सीरीजमधला एक शॉर्ट सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. कायमच आपल्या दमदार अभिनयासाठी चर्चेत राहणारे रवी किशन सध्या आपल्यापेक्षा 24 वर्षे लहान असणाऱ्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करण्यामुळे चर्चेत आहेत. रवी किशन आणि तेजस्वी प्रकाश यांच्या 'सायको सैंया' सीरीजमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांची मने जिंकणार, हे नक्की.
advertisement
सध्या सोशल मीडियावर रवी आणि तेजस्वीच्या सीनची जोरदार चर्चा सुरू आहे. त्या सीनमध्ये, रवी किशन तेजस्वीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. तेजस्वीला पडद्यावर पहिल्यांदाच इंटिमेट सीन करताना चाहते पाहत आहेत. आतापर्यंत टेलिव्हिजन सीरियलच्या माध्यमातून संस्कारी सूनेच्या किंवा नागिनच्या भूमिकेतूनच प्रेक्षकांना दिसली आहे. पण आता, "सायको सैंया" मध्ये तिने एक धाडसी भूमिका साकारली असून तिने तिच्या आदर्श सूनची इमेज मोडित काढली आहे. सध्या सोशल मीडियावर तेजस्वीच्या अभिनयाची जोरदार चर्चा होते.
दरम्यान, तेजस्वीनीचा इंटिमेट सीन पाहिल्यानंतर चाहते तिला ट्रोल करत असून काहींनी तिच्या अपकमिंग प्रोजेक्टचे कौतुकही केले आहे. "सायको सैंया" वेबसीरीजबद्दल बोलायचे तर, ही वेबसीरीज 25 फेब्रुवारी 2026 रोजी Amazon MX Player या ओटीटी ॲपवर रिलीज झाली.
