नुकतेच, बिग बॉस च्या घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला, यादरम्यान अभिषेक कुमार व समर्थ जुरैल यांच्यात जोरदार भांडण झाले. या लढतीदरम्यान अभिषेकने अनवधानाने समर्थला चापट मारली, त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. समर्थ व अभिषेकच्या भांडणादरम्यान ईशा मालवीयने अभिषेकला धक्काबुक्की केली. या घटनेनंतर अभिषेक व ईशामध्ये नवा वाद सुरु झाला. मात्र समर्थच्या कानाखाली मारणं अभिषेकला आता महागात पडणार असल्याचं दिसत आहे.
advertisement
दरम्यान, अभिषेकबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे, जी जाणून घेतल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो. आगामी बिग बॉस 17 वीकेंड वारमध्ये, अभिषेक कुमारला घरातील दुसर्या सदस्यावर, समर्थवर हात उचलण्याचा फटका सहन करावा लागू शकतो. शो दरम्यान समर्थ जुरेलला कानाखाली मारून अभिषेकने बिग बॉसचा सर्वात मोठा नियम मोडला आहे, ज्यामुळे आता शोचे निर्माते अभिषेक कुमारवर मोठी कारवाई करू शकतात.
त्यामुळे आगामी वीकेंड का वार एपिसोडमध्ये अभिषेकलाही घराबाहेर काढले जाऊ शकते असं बोललं जातंय. मात्र, या प्रकरणाला अद्याप अधिकृत दुजोरा देता आलेला नाही. पण जर खरंच असं घडलं तर बिग बॉस 17 च्या चाहत्यांना आणि अभिषेक कुमारच्या चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो.
अलीकडेच, सलमान खान शो बिग बॉस 17 दरम्यान, नेहमीप्रमाणे अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय यांच्यात खूप गोंधळ उडाला. समर्थ जुरेलही या दोघांमध्ये आले आणि त्यांनी अभिषेकला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. प्रकरण इतके वाढले की अभिषेक कुमारचा संयम सुटला आणि समर्थला जोरदार चापट मारली. आता याचाच फटका त्याला बसू शकतो.
