'25 वर्षानंतरही शालिनी तरुणच... ' 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेच्या नव्या ट्विस्टची प्रेक्षकांनी उडवली खिल्ली
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
शालिनीची या मालिकेच्या नव्या सीझनमध्येही लवकरच एंट्री होणार आहे. शालिनीचा पूर्ण लूक बदललेला पाहायला मिळणार आहे. पण प्रेक्षकांना मालिकेत आलेला हा ट्विस्ट फारसा पसंत पडलेला दिसत नाही. प्रेक्षकांनी मालिकेच्या या नव्या ट्विस्टवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुंबई : स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत काही दिवसांपूर्वीच नवं वळण आलं. जयदीप-गौरी च्या लव्हस्टोरीचा अंत झाला पण त्यांचा पुर्नजन्म झाला असून ते नित्या आणि अधिराज या रूपाने पुन्हा भेटले आहेत. नित्या आणि अधिराज ही जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत नव्या कथानकासोबत अनेक नवी पात्रही भेटीला आली आहेत. मालिकेच्या पहिल्या भागात खलनायिका असलेल्या शालिनीचाही अंत झाला होता, असं प्रेक्षकांना वाटलं. पण तसं नाहीये. शालिनीची या मालिकेच्या नव्या सीझनमध्येही लवकरच एंट्री होणार आहे. शालिनीचा पूर्ण लूक बदललेला पाहायला मिळणार आहे. पण प्रेक्षकांना मालिकेत आलेला हा ट्विस्ट फारसा पसंत पडलेला दिसत नाही. प्रेक्षकांनी मालिकेच्या या नव्या ट्विस्टवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना पहायचं होतं त्या शालिनी शिर्के-पाटीलची लवकरच मालिकेत एण्ट्री होणार आहे. जयदीप-गौरीसोबत शिर्के-पाटील कुटुंबांतील अनेक सदस्यांच्या मृत्यूला शालिनी जबाबदार होती. आपल्या कुटुंबाचा सर्वनाश केल्यानंतर आता जवळपास 25 वर्षांनंतर ती पुन्हा कोल्हापुरात परत येणार आहे. अभिनेत्री माधवी निमकर पुन्हा एकदा नव्याने शालिनीच्या भूमिकेत दिसणार आहे.
बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीनं लिहिलेत सुपरहिट 'सीता रामम' चित्रपटाचे हिंदी संवाद; नाव ऐकून व्हाल चकित
नवा प्रोमो समोर आला असून शालिनीचं रूप पूर्णपणे बदललेलं पाहायला मिळालाही. शालिनीने 25 वर्ष अमेरिकेत घालवल्यानंतर तिच्या रहाणीमानात बरेच बदल झाले आहेत. इतके दिवस आपण शालिनीला साडीमध्ये आणि अस्खलित कोल्हापुरी भाषा बोलताना पाहिलं आहे. मात्र आता शालिनी मॉडर्न अंदाजात दिसणार आहे. प्रेक्षकांना मात्र मालिकेचा हा ट्विस्ट फारसा आवडलेला नाही.
advertisement
advertisement
मालिकेच्या या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया देत त्याची खिल्ली उडवली आहे. प्रेक्षकांनी या प्रोमोवर, 'शालिनी च्या तारुण्याचं रहस्य नक्की काय असतं?', '25 वर्षांनंतरही ती एवढी तरुण कशी?, '25 वर्षात ही म्हातारी नाही का झाली?', 'शालिनीचाही पुर्नजन्म झालाय का?' अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी यावर दिल्या आहेत. 25 वर्षांनंतर शालिनीचा स्वभाव बदलला आहे की अजूनही तिच्या मनात सुडाची आग धगधगतेय हे लवकरच कळेल.
advertisement
मालिकेत आता पुढे काय घडणार, शालिनीच्या समोर तिचा भूतकाळ कसा उभा राहणार, शालिनी नित्या अधिराजला पाहिल्यावर काय प्रतिक्रिया देणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. पण काही प्रेक्षकांनी शालिनीला पाहताच मालिकेच्या पुढच्या भागांविषयी उत्सुकता दाखवली आहे. त्यामुळे प्रेक्षक आता मालिकेच्या या आगामी भागांना कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 04, 2024 6:47 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'25 वर्षानंतरही शालिनी तरुणच... ' 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेच्या नव्या ट्विस्टची प्रेक्षकांनी उडवली खिल्ली