बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीनं लिहिलेत सुपरहिट 'सीता रामम' चित्रपटाचे हिंदी संवाद; नाव ऐकून व्हाल चकित
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
‘सिता रामम्’ या तेलुगू चित्रपटाला हिंदी प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमान, मृणाल ठाकूर आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात दाखवलेली लव्हस्टोरी प्रेक्षकांना भावली होती, सोबतच त्यातील गाणीही हिट झाली होती. या चित्रपटाचे हिंदी संवाद एका मराठी अभिनेत्रीनं लिहिले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अभिनेत्री नेहा शितोळेने नुकतीच ‘अजब गजब पॉडकास्ट’लादिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्यावेळे ती म्हणाली, 'मधल्या काळात मी खूप लिखाणाचं काम केलं. पण सगळ्यांनाच माहितेय ते काम असं नाही. म्हणजे ‘सीता रामम्’ नावाचा एक तेलुगू चित्रपट आहे. दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूर हे दोघं जण त्याच्यामध्ये प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.'
advertisement
advertisement
advertisement