115 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचलं क्रूड ऑइल! पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Petrol Diesel Price Hike : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये आज जोरदार वाढ झाली आहे आणि इंट्राडेमध्ये हे 115 डॉलर प्रति बॅरलवर गेल्या आहेत. क्रूडमध्ये आलेल्या या तेजीनंतर आता भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
जागतिक ऊर्जा बाजारपेठेतील हाहाकाराच्या पार्श्वभूमीवर, सामान्य माणसाला एकच प्रश्न आहे: पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढतील का? घरगुती सिलिंडरच्या किमतीत अचानक 60 रुपयांनी वाढ केल्याने किमती वाढण्याची भीती आणखी वाढली आहे. तसंच, भारत सरकार सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्याच्या मनःस्थितीत नाही.
advertisement
advertisement
advertisement
तेल कंपन्यांना 'त्याग' करावे लागतील : किंमती स्थिर ठेवण्यासाठी तेल कंपन्यांनी त्यांचे नफा मार्जिन कमी करावे अशी सरकारची इच्छा आहे. भारतातील इंधनाच्या किमती सामान्यतः आंतरराष्ट्रीय दरांनुसार दररोज निश्चित केल्या जातात, परंतु अपवादात्मक परिस्थितीत, सरकार हस्तक्षेप करते. आता कच्च्या तेलाने 100 डॉलर्स ओलांडले आहेत, जर पंप किमती वाढवल्या नाहीत, तर इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम सारख्या कंपन्यांच्या मार्केटिंग मार्जिनवर गंभीर दबाव येईल. या कंपन्यांना काही काळासाठी कमी नफा किंवा संभाव्य तोट्यासह काम करावे लागू शकते.
advertisement
$115 च्या पार गेले क्रूड ऑइल : आज वेस्ट टेक्सस इंटरमीडिएट (WTI)कच्चे तेल 17.4% च्या मोठ्या बढतीसह $106.8 प्रति बॅरलवर पोहोचले आहे. तसंच जागतिक मानक मानले जाणारे ब्रेंट क्रूड (Brent Crude) ही 18% वाढून $115 प्रति बॅरलच्या स्तरावर पोहोचले आहे. किंमतींमध्ये वेगवान वाढीमुळे सोमवारी भारतासह आशियाई शेअर बाजारातही घसरण नोंदवण्यात आली आहे.कारण गुंतवणूकदार ऊर्जा संकटामुळे निर्माण होणाऱ्या महागाईच्या धोक्याबद्दल चिंतेत आहेत.









