सध्या बिग बॉस मध्ये एक विषय चांगलाच चर्चेत आहे तो अंकिता लोखंडे आणि विकी जैनची भांडणं. या घरात असल्यापासून दोघेही फक्त भांडणच करत आहेत. आता या दोघांचे कान पिळायला घरात खास पाहुण्यांची एंट्री होणार आहे. शनिवारच्या एपिसोडमध्ये, विक्की जैन आणि अंकिता लोखंडे यांची आई बिग बॉसच्या घरात येणार आहेत. या दोघीही अंकिता आणि विकीला त्यांच्या नात्याबद्दल सल्ला देतील. खरंतर विकी-अंकिताचं नातं सध्या वेगळ्याच दिशेने जाताना दिसतंय. त्यामुळेच त्याला योग्य मार्गावर आणता यावे म्हणून निर्मात्यांनी त्याच्या कुटुंबातील सदस्यांना शोमध्ये बोलावले आहे. मात्र या संवादादरम्यान अंकिताची सासू तिच्या सुनेवर रागावलेली दिसली.
advertisement
लग्नात वाढपी म्हणून करायची काम; प्लास्टिक सर्जरीनं बदललं आयुष्य; राखी सावंतचं खरं नाव माहितीये का?
बिग बॉस सीझन 17 चा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये विकी आणि अंकिता त्यांच्या कुटुंबियांना भेटत आहेत. यादरम्यान विकी आपल्या आईला पाहून भावूक होतो आणि रडू लागतो. हे पाहून विकीची आई तिच्या मुलाला रडण्यास मनाई करते आणि त्याला छान खेळायला सांगते. तिने अंकितालाही खडसावलं आहे. ती म्हणाली, 'तुम्ही दोघे या घरात कधीही भांडला नाहीत, इथे अंकिता माझ्या मुलाला चप्पलने मारत आहे.' यावर विकी रडायला लागतो आणि विकीची आईही. तेव्हा अंकिता म्हणते, 'आई तू रडू नकोस, मी त्याची काळजी घेईन.' यावर विकीची आई सुनेवर चांगलीच रागावली. ती अंकिताला म्हणते, 'नाही, तू सांभाळत नाहीस त्याला, त्याची काळजी घेत नाहीस.' आता घरच्यांनी समजावल्यानंतर तरी अंकिता विकीची भांडणं कमी होणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सोशल मीडियावर खळबळ माजलेला ओरहान अवत्रामणी म्हणजेच ऑरीही शनिवारच्या एपिसोडमध्ये दिसणार आहे आणि त्याची सलमानसोबतची भेट खूपच मजेशीर असणार आहे. त्याची झलक प्रोमोमध्ये पाहायला मिळाली आहे. ऑरी वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
