प्रणित मोरे आणि अमाल मलिक यांच्यात वाद सुरू असताना, बसीर अलीने मध्ये उडी घेतली आणि वाद आणखी वाढला. भांडणाच्या भरात बसीरने प्रणितला रागात “गो बॅक टू युअर व्हिलेज!” असं म्हटलं. बसीरच्या याच वाक्याचा समाचार घेत अंकिता तिच्या व्हिडिओमध्ये म्हणाली, “हा म्हणतोय ‘गो बॅक टू युअर व्हिलेज’, जसा हा मोठ्या शहरातून आला आहे. आलोय आम्ही गावातून... आमच्या गावातले लोक प्रणितला इतके वोट करतील आणि त्या वोट्ससोबत तुला कपडेही पाठवून देतील!” अंकिताने आपल्या मालवणी भाषेतच बसीर अलीला चांगलंच सुनावलं आहे.
advertisement
“आता तर गावी कोण परत जातंय, ते बघायचंय!”
अंकिताने सर्व मराठी प्रेक्षकांना हीच वेळ आहे, असं सांगत आवाहन केलं आहे. ती म्हणाली, “हीच ती वेळ आहे, अख्ख्या महाराष्ट्राने वोट करा. सगळ्या मराठी लोकांनी, गावातल्या गाववाल्यांनी... आता तर आम्हाला बघायचंच आहे की, गावी कोण परत जातंय ते! प्रणितला आता आतच ठेवायचं, तो बाहेर येताच कामा नये.”
अंकिताने स्वतःचा अनुभव सांगत म्हटलं की, “बिग बॉसच्या घरात काय वाटतं, हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असेल. आपल्या भावाला सपोर्ट करा, भरपूर वोट्स करा.” अंकिताच्या आधी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील स्पर्धक धनंजय पोवार यांनीही प्रणितला पाठिंबा देत बसीरला चांगलंच फटकारलं होतं. नुकतंच बिग बॉस फेम निक्की तांबोळीनेही बसीर अलीची कानउघडणी करत प्रणितला जास्तीत जास्त वोट्स करण्याचं आवाहन केलं आहे. यावरून असं दिसून येतंय की प्रणित मोरेला संपूर्ण महाराष्ट्रातून तुफान पाठिंबा मिळत आहे. आता येणाऱ्या दिवसांमध्ये प्रणितचा गेम कसा असेल हे पाहण्यासाठी सर्वच खूप उत्सुक आहेत.