TRENDING:

'मराठा आहे मी...' Bigg Boss 19 मध्ये मराठमोळ्या प्रणित मोरेचा संताप! नेमकं प्रकरण काय?

  • Published by:
Last Updated:

Bigg Boss 19 Pranit More : सुपरस्टार सलमान खानचा 'बिग बॉस 19' या बहुचर्चित कार्यक्रमातील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महाराष्ट्रातला मराठी आहे मी, असं म्हणत चिडलेला प्रणित मोरे पाहायला मिळत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Bigg Boss 19 : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस 19' (Bigg Boss 19) हा कार्यक्रमाची काही दिवसांपूर्वीच तिसरी घंटा वाजली आहे. विविध कारणांमुळे हा बहुचर्चित कार्यक्रम चर्चेत आहे. पण सध्या आपल्या मराठमोळ्या प्रणित मोरे (Pranit More) याचा एक व्हिडीओ मात्र चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मी महाराष्ट्रातला मराठी असून प्रचंड चिडलेला प्रणित मोरे पाहायला मिळत आहे. एकेकाळी प्रणितवर प्रचंड टिका झाली होती. पण आता 'बिग बॉस'च्या घरात जाऊन आपल्या वक्तव्याने प्रणित भाऊने तमाम महाराष्ट्राची मने जिंकली आहेत.
News18
News18
advertisement

प्रणित मोरे काय म्हणाला? (Pranit More Video)

'बिग बॉस'च्या (Bigg Boss 19 House) घरातील व्हायरल व्हिडीओमध्ये प्रणित मोरे वासेपुर (Wasseypur) फेम जीशान कादरी (Zeeshan Quadri) याला उद्देशून म्हणतोय,"जीशान प्रत्येक गोष्टीत वासेपुरबद्दल बोलताना दिसून येतात. वासेपुरमधील गुंडे, डॉन यांच्याबद्दल भाष्य करताना ते दिसून येतात. पण मला वाटतं जर तुम्ही वासेपुरचे डॉन असाल तर मीदेखील महाराष्ट्राचा मराठा आहे. जोपर्यंत प्रेमात बोलतोय तोपर्यंत ठिक आहे. नाहीतर थेट घरी सोडून येईल".

advertisement

व्हिडीओवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव

प्रणित मोरेच्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'जय शिवराय, जय शंभुराजे, एकच नंबर भावा, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, एक मराठा लाख मराठा, अशा पद्धतीच्या कमेंट्स करत चाहते प्रणितला पाठिंबा देताना दिसत आहेत.

Pranit More : सुशीलकुमार शिंदेंच्या नातवावर विनोद केला, कॉमेडियन प्रणीत मोरेला सोलापूरमध्ये मारहाण

advertisement

प्रणित मोरेचा स्वत:चा एक वेगळा चाहतावर्ग आहे. कधी वादग्रस्त वक्तव्यामुळे तर कधी आपल्या हटके संभाषणाच्या स्टाईलमुळे तो चर्चेत असतो. 'बिग बॉस'च्या घरातदेखील तो चांगलाच धुमाकूळ घालत आहे. पण आता महाराष्ट्र आणि मराठा असण्याबद्दल त्याने केलेलं वक्तव्य 'बिग बॉस'प्रेमींसह सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. याआधीदेखील अनेक वक्तव्यांमुळे तो चर्चेत आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'मराठा आहे मी...' Bigg Boss 19 मध्ये मराठमोळ्या प्रणित मोरेचा संताप! नेमकं प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल