फोटोतील ‘ती’ मुलगी कोण?
सूरजने नुकताच एका मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे, ज्यात दोघेही पारंपरिक दाक्षिणात्य पेहरावात दिसत आहेत. या फोटोमध्ये त्या मुलीने तिचा चेहरा झाकलेला आहे, पण सूरजने फोटोला हार्ट इमोजीचं कॅप्शन दिलं आहे. यामुळेच अनेक जण अंदाज लावत आहेत की, ही मुलगी सूरजची नवी प्रेमिका आहे.
‘बिग बॉस’च्या घरात असताना सूरज त्याच्या पिल्लूबद्दल बोलताना दिसला होता. आता त्याने ही नवी पोस्ट शेअर केल्याने, अनेकांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.
सूरजचा ‘झापुक झुपूक’ चित्रपट फ्लॉप!
बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणने मोठ्या पडद्यावरही पदार्पण केलं होतं. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘झापुक झुपूक’ या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. २५ एप्रिल २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण, चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला नाही आणि चित्रपट फ्लॉप ठरला, ज्यामुळे सूरज आणि केदार शिंदे दोघांनाही खूप मोठा धक्का बसला होता.