बिग बॉस हा शो काही नवीन नाही. बिग बॉस मराठीचे आतापर्यंत 5 सीझन झाले आहेत. आता सहावा सीझन आहे. इतक्या सीझनमध्ये नाही मग आताच या शोचं नाव बदलण्याची मागणी होते आहेत. बिग बॉस मराठीच्या एका एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला, त्यानंतर ही मागणी होऊ लागली आहे.
असं या प्रोमोत आहे काय?
advertisement
बिग बॉसच्या नव्यी प्रोमोत चौथ्या आठवड्यात सोमवारी काय होणार हे दाखवण्यात आलं आहे. ज्यात बिग बॉसच्या घरात चोरी झाल्याचं पाहायला मिळतं. चोरीचा आरोप लावण्यात आला तो तन्वीवर. कारण हे सामान तिच्या बेडजवळ सापडतं. तन्वी आपल्यावरील चोरीचा आरोप नाकारते पण कोणी तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि ती आपण घर सोडणार असल्याचा निर्णय घेते. तर प्रेक्षकांनी अनुश्रीच चोर असल्याचं म्हटलं आहे. आता खरा चोर कोण हे एपिसोडमध्येच समजेल. पण या प्रोमोवरून नाव बदलण्याची मागणी का होते आहे?
Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस'च्या घरात 'डर्टिनेस'! बाहेर पडताच सोनाली राऊतने उलगडलं मोठं सीक्रेट
तर चोरीमुळेच नाव बदलण्याची मागणी होते आहे. याचं कारण म्हणजे बिग बॉसच्या घरातील ही चोरी नवीन नाही. याआधीही बिग बॉसच्या घरात चोरी झाली आहे. आधी चावी, मग अंडी, नंतर बॉडीवॉश आणि आता चॉकलेट, तांदळासारखं रेशनचं सामान.
बिग बॉसमधील चोरीचं हे कार्ड अनेक प्रेक्षकांना आवडलं नाही आहे. 'सीझन सिक्स इथं चोरी फिक्स' अशी कमेंट एका युझरने केली आहे. तर एकाने आपण बिग बॉस नाही तर सीआयडी पाहतो आहे असं वाटतं असल्याचं म्हटलं. एका युझरने तर 'ऐका मित्रानो हा बिग बॉसचा शो नाही वाटत, या वेळेस शोचं नाव चोर पोलीस ठेवा आता', थेट अशीच मागणी केली.
बिग बॉसच्या घरात चोरी का होतेय?
बिग बॉस मराठी’च्या घरात यंदाच्या थीमनुसार दर आठवड्यात घरातील स्पर्धकांना एक विशेष रेशन कार्ड लागू केलं जातं. कॅप्टनसह टास्कमध्ये बाजी मारणाऱ्या सदस्यांना गोल्डन रेशनकार्ड मिळतं. तर इतर सदस्यांना नियमांनुसार सिल्व्हर किंवा ब्राँझ रेशन कार्ड दिलं जातं. ब्राँझ रेशन कार्डधारकांना घरातील कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. त्यांच्यावर लक्झरी प्रोडक्ट्स वापरण्याचीही बंदी असते. यामुळे ज्यांच्याकडे ब्राँझ रेशनकार्ड आहे असे सदस्य घरातील अन्य लोकांचं समान चोरी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
