बिग बॉस मराठी 6 मधील भाऊच्या धक्क्याचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. ज्यात दिपाली सय्यद रडताना दिसत आहे. रितेश देशमुख दिपाली सय्यदबाबत काहीतरी सांगतो आणि तिला रडू आवरत नाही. रितेश विशाल कोटियनने दिपाली आणि तन्वीबाबत केलेल्या वक्तव्याची पोलखोल करतो.
advertisement
रितेश म्हणतो, "विशाल कॉम्पिटिटर आणि हेटर्समध्ये फरक असतो. 'आय हेट दिपाली, आय हेट तन्वी, अरे दुकानातल्या सेल्स गर्ल्ससारखे दिसतात', असे शब्द तुम्ही वापरले. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राला हे आवडलंय?"
हे ऐकताच तन्वी आणि दिपाली यांना खूप वाईट वाटतं. दिपालीला तर रडूच कोसळतं. ती रडताना दिसते. रितेशचं बोलणं झाल्यावर विशाल म्हणतो, "दिपाली माझी चांगली मैत्रीण आहे". यावर दिपाली विशालला रोखते आणि म्हणते, "नको बोलूस प्लीज! चांगली मैत्रीण तर नकोच बोलूस"
विशालने दिपाली आणि तन्वीबाबत त्यांच्या पाठीमागे हे जे काही त्यांच्याबाबत वाईट शब्द वापरलेत, त्याची पोलखोल रितेशने भाऊच्या धक्क्यावर केली आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
रितेशने रुचितालाही झापलं
रुचितानेही दिपालीसमोर आ थूं असं केलं. यावरून रितेशने रुचिताचीही शाळा घेतली. यावेळी तिने दिलेले एक्स्प्रेशन पाहून तर रितेश आणखीनच भडकला. अशांना भाऊच्या धक्क्यावर जागा नाही. उठ आणि निघ असं रितेशने रुचिताला सांगितलं. शेवटी तो बंद करा, असं म्हणतानाही दिसतो.
त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर नेमकं आज काय होणार, हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
