एका टास्कमध्ये तन्वीने दिव्याला नॉमिनेट केल्यामुळे दिव्या संतापली. तिचा राग इतका अनावर झाला की तिनं थेट तलवार चालवण्याची धमकी दिली. दिव्या म्हणाली, "मी या घराबाहेर सरकार म्हणून वावरते आणि माझ्या हातात कायम एक तलवार असते. आता ती तलवार घरी आहे याचा अर्थ असा नाही की मी इथल्या गोष्टी विसरेन. बाहेर गेल्यावर मी ती तलवार चालवेन. ती कोणावर चालेल हे तुम्ही माझ्याबद्दल काय बोलता यावर ठरेल."
advertisement
( BBM च्या घरात राखी बनली पोलीस, प्रभूच्या इंग्रजीनं घालता घोळ; ऐकून हसू आवरणार नाही, VIDEO )
हा प्रकार पाहून घरातील सदस्यही घाबरले. या वक्तव्यानंतर बिग बॉसनं तिला स्वतःची चूक सुधारण्याची संधी दिली होती. मात्र दिव्यानं माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर बिग बॉसनं कडक पाऊल उचलत तिला घरातून बाहेर काढलं.
घरातून बाहेर पडल्यानंतर दिव्या शिंदे पहिल्यांदाच सोशल मीडियावर समोर आली आहे. तिनं एक व्हिडीओ शेअर करत तिच्या चाहत्यांचे आभार मानले. व्हिडीओमध्ये ती म्हणाली, "नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून आणि परदेशातून तुम्ही मला जे आशीर्वाद, प्रेम आणि सपोर्ट दिला त्यासाठी मी नेहमीच ऋणी राहिन. लवकरच येतेय तुमच्या समोर. आता विषय संपला नाही, विषय सुरू झालाय. जय भीम, जय शिवराय."
दिव्यानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बिग बॉस किंवा घरातील कोणत्याही सदस्याचा थेट उल्लेख केलेला नाही. त्यामुळे तिचा इशारा नेमका कोणासाठी होता याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. विषय संपला नाही, सुरू झालाय या वाक्यामुळे आता ती कोणता खुलासा करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दिव्या शिंदे घराबाहेर आल्यानंतर नेमकं काय बोलणार, कोणते खुलासे करणार हे येत्या काळात पाहायला मिळेल.
