बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात राखी घरात तोडफोड करताना दिसते आहे. सुरुवात सागरसोबतच्या वादाने झाली आहे. राखी आणि सागरमध्ये वाद होतो. घरातील साफसफाईवरून हा वाद झालेला दिसतो आहे.
Bigg Boss Marathi 6 : करण-प्राजक्ताचा गुपचूप रोमान्स; पण 'बिग बॉस'च्या कॅमेऱ्यात कैद झाला
advertisement
बाथरूममध्ये घाण झालेली आहे. राखी सागरला ते दाखवते आणि हे स्वच्छ करा असं सांगते. पण सागर साफसफाई करायला थेट नकार देतो. सागर राखीला म्हणतो, "तू मला सांगू नकोस. मी वॉचमन नाही. मी साफ करणार नाही" यानंतर राखी भडकून म्हणते, "हे तुम्हाला करावं लागेल. आम्ही पण जेवण बनवतो ना. ते खाता ना तुम्ही? मग नाटकं का करता?" असं बोलून राखी वॉशरूम एरियाच्या बाहेर येते आणि रागात किचनमध्ये जाते. तिथं येऊन ती काचेची वस्तू फोडते.
दगडी चाळीत बालपण, ब्लॅकची तिकिटं विकून भरली शाळेची फी; BBM 6 चा मास्टर माइंड विशालची Inside Story
यावर सगळे राखीला ओरडताना दिसतात. तू असं नाही करू शकत, तोडफोड नाही करू शकत असं सांगता. 'बिग बॉस'च्या घरातील कोणतीही वस्तू फोडणं हा नियमभंग आहे. राखीने हा नियम मोडला आहे. त्यामुळे आता घरात कोणता ड्रामा पाहायला मिळणार याची उत्सुकता आहे.
दरम्यान नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. राखीने गेम एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलाय, राखी आली तेव्हापासून शो वेगळ्याच लेव्हलला गेलाय, जे कॅमेऱ्यासमोर येत नव्हतं तेसुद्धा शोमध्ये दिसू लागलेत, राखीमुळे बिग बॉस पाहायला मजा येतेय, राखी बोलते सबको कोलते, राखीने सागरचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला, वाह एक नंबर आता खरी मजा येणार शो पाहायला, राखीने वाट लावलीये सर्वांची, अशा कमेंट या प्रोमोवर आल्या आहेत.
