Bigg Boss Marathi 6 : करण-प्राजक्ताचा गुपचूप रोमान्स; पण 'बिग बॉस'च्या कॅमेऱ्यात कैद झाला
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Karan Sonawane Prajakta Shukre : बिग बॉस मराठी 6 च्या घरात करण सोनावणे आणि प्राजक्ता शुक्रेमध्ये प्रेम बहरत असल्याची चर्चा होती. आता त्याचा पुरावाच मिळाला आहे.
सतत वाद, भांडण यामुळे चर्चेत राहिलेला बिग बॉस मराठीचा सहाव्या सीझनमध्ये आता प्रेम फुलताना दिसतं आहे. आधी रुचिता - विशाल आणि त्यानंतर करण - प्राजक्ताच्या प्रेमाची चर्चा होत होती. करणने त्याच्या भावना प्राजक्तासमोर व्यक्तही केल्या होत्या. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेम बहरत असल्याचा अंदाज सगळ्यांनी बांधला. पण हा फक्त अंदाज नाही, हे खरं आहे. प्राजक्ता आणि करणमध्ये खरंच प्रेम बहरत आहे. त्यांच्यात गुपचूप रोमान्स सुरू आहे. पण तो बिग बॉसच्या कॅमेऱ्यात मात्र कैद झाला आहे.
बिग बॉस मराठी 6 च्या घरात कॅप्टन्सीचा नवा टास्क आहे. यामध्ये घरातील सगळे सदस्य फळं बनले आहेत. यात प्राजक्ता स्ट्रॉबेरी तर करण संत्रं बनला आहे. एपिसोडच्या प्रोमोममध्ये बिग बॉस स्ट्रॉबेरी बनलेल्या प्राजक्ताचं कौतुक करतात. प्राजक्ता तुम्हाला स्ट्रॉबेरी छान वाटते आहे. यावर प्राजक्ता गोड लाजते, हसते आणि बिग बॉसला थँक्यू म्हणते. त्याचवेळी तिच्या मागे उभा असलेला करणही लाजताना दिसतो. बिग बॉस ते पाहतात आणि स्ट्रॉबेरीचं कौतुक केल्यावर संत्रं का लाजलं? असं विचारतात. यावर प्राजक्ता, करण दोघंही पुन्हा लाजून हसतात.
advertisement
यानंतर पुढे दोघंही एकत्र बसलेले दिसतात आणि फळांच्या बोर्डच्या आड एकमेकांची छेड काढताना दिसतात. त्यांचा हा एकप्रकारे रोमान्सच आहे. यावरून प्राजक्ता आणि करण यांच्यात खरंच प्रेम बहरलं, यावर नेटिझन्सनी शिक्कामोर्तब केलं आहे.
advertisement
करणने प्राजक्तासमोर व्यक्त केल्या भावना
याआधी करणने प्राजक्तासमोर आपल्या भावना व्यक्त केल्याच आहे. प्राजक्ता प्रभूला त्याच्यात आणि तन्वीमध्ये किती अंतर आहे, असं विचारते. राखी हे ऐकून तन्वीला सांगते. यावर तन्वी प्राजक्ताला करणबद्दल विचारते.
तन्वी प्राजक्ताला म्हणते, 'करण तुला मांडीवर घेऊन डोक्याला मसाज करतो, तेव्हा काय' यावर करण तन्वीला सुनावतो. 'आता विशाल भाव नाही देत ना, म्हणून इथे आलीये ती', असं म्हणतो. रुचिता करणला म्हणते, 'तिचा फेक लव्ह अँगल नाही चालला, आयुषने भाव नाही दिला.' करण राकेशला म्हणतो, 'आमच्यामध्ये प्रेम असेल, मैत्री असेल, लग्न असेल, पण आम्ही Individual खेळतो.' त्यावर राकेश म्हणतो, 'तू फक्त तिला जप. तिच्या भावनांना सांभाळ'
advertisement
यानंतर करण प्राजक्ताबद्दल काळजी व्यक्त करतो. तन्वी प्राजक्ताला बोलते त्यामुळे करणला त्रास होतो. तो भावुक होतो आणि आपल्या भावना प्राजक्तासमोर व्यक्त करतो. करण प्राजक्ताला म्हणतो, 'आयुष्यात मी कोणासोबत एवढं कनेक्ट नाही झालेलो. मला काळजी वाटायला लागली तुझी. असं कोणासोबत राहिलो नाहीये मी. मला इथं पहिल्यांदा फील झालं. आधी माझ्या आई-वडिलांना त्रास झाला की, मला त्रास होतो. एवढ्या वर्षात माझ्या आयुष्यात कधीच नव्हतं झालं. एवढ्या वर्षांचा बंद रस्ता होता, तो आता सुरू झाला, म्हणून मी बोलायला टाळत होतो. मला इमोशनल नाही व्हायचंय, पण मला तो बांध नाही फोडायचा. आपण जेन्युईन असतो'
advertisement
त्यावर प्राजक्ता करणला समजावताना म्हणते, 'एवढा विचार नको करूस, मला माझं आयुष्य बिग बॉस नंतरचं पण महत्वाचं आहे. लोक लक्षात ठेवतात'
advertisement
प्राजक्ता आणि करणची ही जोडी काही प्रेक्षकांना आवडली आहे, तर काहींना नाही. पण तुम्हाला ही जोडी कशी वाटली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्सममध्ये नक्की सांगा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 10:45 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : करण-प्राजक्ताचा गुपचूप रोमान्स; पण 'बिग बॉस'च्या कॅमेऱ्यात कैद झाला








