advertisement

"मी चॅनेलला वेळ दिला आहे...", 'बिग बॉस'च्या मेकरला दिव्या शिंदेचा इशारा; लपवलेल्या फुटेजसंबंधी कायदेशीर धमकी

Last Updated:

Divya Shinde-Bigg Boss Marathi 6 Controversy: नॅशनल टेलिव्हिजनवर सदस्यांना धमकी दिल्याच्या आरोपाखाली दिव्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र, आता घराबाहेर पडल्यावर दिव्याने थेट निर्मात्यांनाच कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

News18
News18
मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या गेल्या सर्व सीझनमध्ये अनेक वाद झाले, पण दिव्या शिंदेने घराबाहेर पडताच जो राडा घातला आहे, तो आता चांगलाच तापला आहे. नॅशनल टेलिव्हिजनवर "बाहेर गेल्यावर तलवार चालवेन" असं म्हणत सदस्यांना धमकी दिल्याच्या आरोपाखाली दिव्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
मात्र, आता घराबाहेर पडल्यावर दिव्याने थेट निर्मात्यांनाच कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. काल मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिव्याने जे काही बॉम्ब फोडले, त्याने 'बिग बॉस'च्या पडद्यामागच्या खेळावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दिव्या शिंदेने 'बिग बॉस'वरच चालवली तलवार

दिव्या शिंदेचा सर्वात मोठा आरोप हा आहे की, शोमध्ये तिचा फक्त एकच चेहरा दाखवण्यात आला, जो रागीट होता. मात्र, त्या रागाच्या आधी काय घडलं, हे मुद्दाम लपवलं गेलं. दिव्या म्हणाली, "मी चॅनेलला वेळ दिला आहे. एकतर तुम्ही ते सर्व फुटेज बाहेर काढा जे तुम्ही एडिट केलेत."
advertisement
दिव्या पुढे म्हणाली, "माझी बदनामी झाली आहे, ती तुम्ही तुमच्या लेव्हलवर सावरली तर ठीक, नाहीतर पुढची कारवाई करण्यासाठी मी सज्ज आहे. खरं तर, मीच बिग बॉसला सांगितलं होतं की मला हा शो सोडायचा आहे, मला हे जमत नाहीये. पण त्यांनी ते कधीच प्रेक्षकांना दाखवलं नाही."
advertisement
advertisement

एक धमकी अन् दिव्याला सोडावा लागला शो

या वादाची सुरुवात एका टास्कपासून झाली होती. जेव्हा तन्वी कोलतेने दिव्याला 'घरात योग्य न वाटणारी सदस्य' म्हटलं, तेव्हा दिव्याचा संयम सुटला. यावेळी दिव्याचं बिग बॉससोबतही कडाक्याचं भांडण झालं होतं, पण नंतर तिने माफीही मागितली होती. तरीही, थोड्या वेळाने तिने घरातील सदस्यांना एकत्र करून आपल्या त्या वादग्रस्त विधानाची तोफ डागली.
advertisement
ती म्हणाली होती, "बाहेर मी सरकार म्हणून वावरते आणि माझ्या हातात नेहमी तलवार असते. जरी मी ती तलवार आता घरी ठेवून आले असले, तरी बाहेर गेल्यावर मी ती नक्कीच चालवेन. ती कोणावर चालणार हे तुम्ही माझ्याशी कसं वागता यावर ठरेल." या विधानानंतर घरात मोठा गदारोळ झाला आणि सदस्यांनी तिच्यावर धमकी दिल्याचा आरोप केला.
advertisement
आपल्या विधानाचा बचाव करताना दिव्या भावूक झाली. ती म्हणाली, "लोकांनी माझ्या शब्दांचा खूप चुकीचा अर्थ काढला. या लोकशाही देशात कोणी खरंच कोणाला मारायला तलवार घेऊन जाणार आहे का? माझी तलवार ही वैचारिक होती, स्वाभिमानाची होती. मी बिग बॉसला विनंती केली होती की मला बाहेरच्या गोष्टी बोलायला लावू नका, पण तिथे माझं ऐकणारं कोणी नव्हतं."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
"मी चॅनेलला वेळ दिला आहे...", 'बिग बॉस'च्या मेकरला दिव्या शिंदेचा इशारा; लपवलेल्या फुटेजसंबंधी कायदेशीर धमकी
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement