TRENDING:

O God Bigg Boss! 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात तन्वी कोलतेची किंचाळी; असं काय घडलं?

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात तन्वी कोलते बिग बॉसचं नाव घेत ओरडताना दिसली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तन्वी कोलते, बोलते, सगळ्यांना सोलते.... अशी ओळख असलेली बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमधील स्पर्धक. जी बिग बॉस मराठी 6 च्या घरात कितीतरी वेळा रडताना दिसली आहे. याच तन्वीचा आता घरात किंचाळण्याचा आवाज आला आहे. O God Bigg Boss असं ती मोठ्याने ओरडली आहे. तन्वीसोबत नेमकं असं घडलं तरी काय?
News18
News18
advertisement

बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात तन्वी बिग बॉसचं नाव घेत ओरडताना दिसली आहे. प्रोमोमध्ये तन्वी कॅप्टन झालेली दिसते. त्यावेळी ती रुचिता जामदारशी भिडते. त्यानंतर रुचिता असंकाहीतरी करते की तन्वी ओरडते. आता नेमकं असं घरात घडलं तरी काय ते पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.

Bigg Boss Marathi 6 : तुझ्यासारखे छप्पन, फाडून फेकले! कॅप्टन होताच रुचिता जामदारने तन्वी कोलतेला 'सोललं'

advertisement

प्रोमोच्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता,  तन्वी सोफ्यावर बसली आहे, त्यावेळी रुचिता बेडवर झोपली आहे. रुचिताला झोपलेलं पाहून तन्वी रुचिताला झोपू नको असं सांगते. यावर तन्वी तिला 'तू आहेस कोण मला सांगणारी', असं विचारतं.

यानंतर तन्वी उठून रुचिताच्या बेडजवळ जाते आणि तिच्या कानात जोरात ओरडते, 'ओ बिलो द बेल्टवाली रुचिता उठ'. तरी रुचिता काही उठत नाही. ती आपले डोळे बंदच ठेवते आणि म्हणते, 'तुझ्यासारखे फाटके आवाज फाडून कधीच फेकलेत कुठे कुठे'. त्यावर तन्वी बोलते, 'तू घट्ट तेवढीच मी तिखट.'

advertisement

Bigg Boss Marathi 6 : काय टेन्शन देताय तुम्ही! कॅप्टन्सीचा टास्क पाहूनच राकेश बापट घाबरला

तन्वी तिला उत्तर देते, अगं तुझ्यासारखे लय छप्पन बघितले, असं म्हणतच ती उठते आणि तन्वीच्या हातातील वस्तू खेचून रागात फेकून देते, ती वस्तू फुटल्याचा आवाज येतो आणि तन्वी ओ गॉड बिग बॉस असं ओरडते. प्रोमोच्या शेवटी फक्त तन्वीची किंचाळी ऐकू येते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दांडपट्टा ते वाघनख, शिवकालीन दुर्मिळ ठेवा पाहिला का? पुण्यात भरलंय भव्य प्रदर्शन
सर्व पहा

रुचिता आणि तन्वीमध्ये झटापट झाली आहे. ज्यात रुचिताने मर्यादा ओलांडल्याचं दिसतं आहे. आता बिग बॉसच्या घरात कोणता नवा ड्रामा पाहायला मिळणार, या नव्या ड्रामानंतर बिग बॉस काय करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
O God Bigg Boss! 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात तन्वी कोलतेची किंचाळी; असं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल