Bigg Boss Marathi 6 : तुझ्यासारखे छप्पन, फाडून फेकले! कॅप्टन होताच रुचिता जामदारने तन्वी कोलतेलाच 'सोललं'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte Ruchita Jamdar : बिग बॉस मराठी 6 च्या घरात येताच रुचिता जामदार आणि तन्वी कोलते यांच्यात वादाची ठिगणी पडली होती. ती आता चांगलीच पेटली आहे.
बिग बॉस मराठी 6 च्या घरात येताच रुचिता जामदार आणि तन्वी कोलतेमध्ये वादाची ठिगणी पडली होती. ही ठिणगी आता अधिकच पेटत गेली आहे. कोलते, बोलते, सगळ्यांना सोलते अशी ओळख असणाऱ्या तन्वीलाच रुचिताने सोडलं आहे. तन्वी कॅप्टन होताच रुचिताने तिच्यावर जबरदस्त वार केला आहे.
बिग बॉस मराठीच्या नव्या एपिसोडच्या प्रोमो समोर आला आहे. ज्यात तन्वी कॅप्टन झाल्याचं दिसतं आहे. तन्वी सोफ्यावर बसली आहे, त्यावेळी रुचिता बेडवर झोपली आहे. रुचिताला झोपलेलं पाहून तन्वी रुचिताला झोपू नको असं सांगते. यावर तन्वी तिला 'तू आहेस कोण मला सांगणारी', असं विचारतं.
advertisement
यानंतर तन्वी उठून रुचिताच्या बेडजवळ जाते आणि तिच्या कानात जोरात ओरडते, 'ओ बिलो द बेल्टवाली रुचिता उठ'. तरी रुचिता काही उठत नाही. ती आपले डोळे बंदच ठेवते आणि म्हणते, 'तुझ्यासारखे फाटके आवाज फाडून कधीच फेकलेत कुठे कुठे'. त्यावर तन्वी बोलते, 'तू घट्ट तेवढीच मी तिखट.'
advertisement
तन्वी तिला उत्तर देते, अगं तुझ्यासारखे लय छप्पन बघितले, असं म्हणतच ती उठते आणि तन्वीच्या हातातील वस्तू खेचून रागात फेकून देते, ती वस्तू फुटल्याचा आवाज येतो आणि तन्वी ओ गॉड बिग बॉस असं ओरडते. प्रोमोच्या शेवटी फक्त तन्वीची किंचाळी ऐकू येते.
बिग बॉसच्या सुरुवातीला रुचिता-तन्वीमध्ये वाद
पहिल्याच दिवशी तन्वी कोल्ते आणि रुचिता जामकर यांच्यातील वाद पाहून प्रेक्षकांनी अक्षरशः तोंडात बोटं घातली होती. करण सोनवणे आणि रुचिता जामकर गार्डन एरियात बसून गप्पा मारत होते. यावेळी ते दोघं घरातील स्विमिंग पूल विषयी बोलताना दिसले. करण आपल्या मिश्किल शैलीत म्हणतो, "स्विमिंगमध्ये गेल्यावर आपण थोडंफार पाणी पितोच ना... उगाच फालतूमध्ये..." असं म्हणत तो बुडण्याचा अभिनय करून दाखवतो. रुचिता त्याच्या या जोकवर हसते.
advertisement
तिथे जवळच उभी असलेल्या तन्वी कोलतेला 'फालतू' शब्द जिव्हारी लागतो. ती त्याला मधेच टोकते आणि म्हणते, "तू फालतूमध्ये असं म्हणू नकोस." इथूनच वादाची ठिणगी पडली. रुचिताला तन्वीचं असं मधेच बोलणं खटकतं. ती तडक उत्तर देते, "ही नेहमी टपलेलीच असते, कोण काय बोलतंय याकडे हिचं लक्ष असतं आणि ही शस्त्र घेऊनच तयार असते." यावर तन्वीचा पारा चढतो आणि ती ओरडून सांगते, "तू लिमिट क्रॉस करू नकोस!"
advertisement
'माझ्या आतून कुणालातरी बाहेर काढलं', हॉरर फिल्मच्या शूटिंगनंतर शरीरात भूत घुसल्याचा अभिनेत्रीचा दावा
यावर मात्र रुचिताचा राग अनावर होतो. ती तन्वीला थेट बिनडोक म्हणते आणि रागाच्या भरात "तुझं तोंड शेणात घाल" असं अतिशय टोकाचं विधान करते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 12:14 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : तुझ्यासारखे छप्पन, फाडून फेकले! कॅप्टन होताच रुचिता जामदारने तन्वी कोलतेलाच 'सोललं'










