TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : सगळ्यांना सोलते ती तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी 6' सोडणार, स्वत:च घराबाहेर पडण्याचा निर्णय; कारण काय?

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte : बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडच्या प्रोमो समोर आला आहे. ज्यात तन्वी कोलतेसोबत असं काहीतरी घडलं की तिने थेट आपल्याला हा शो करायचा नाही, आपल्याला शो सोडायचं आहे, असा निर्णय घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉसच्या घरातील सदस्यांची धडपड असते ती घरात शेवटपर्यंत राहून विजेता होण्यासाठी. त्यामुळे जेव्हा नॉमिनेशन होतं आणि एव्हिक्शनचा दिवस येतो तेव्हा सदस्यांची धाकधूक वाढलेली असते. जो तो आपण घरात राहावं अशी प्रार्थना करतो. असं असताना बिग बॉस मराठी 6 च्या घरातील सदस्य तन्वी कोलतेने मात्र शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
News18
News18
advertisement

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये 2 एव्हिक्शन झाले. तिसऱ्या आठवड्यापर्यंत दोन सदस्य घराबाहेर पडले. पहिली राधिका पाटील आणि दुसरी सोनाली राऊत. एव्हिकेशन आठवड्याच्या शेवटी होतं. पण आता चौथ्या आठवड्यात आठवड्याच्या सुरुवातीलाच तन्वी कोलतेने आपल्याला शो करायचा नाही, घराबाहेर पडायचं आहे, असं म्हटलं आहे. तिने स्वत:च घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 'डोळ्यांनी बोलते, सगळ्यांना सोलते तन्वी कोलते', असं सागर कारंडे तन्वीबाबत बोलतो. पण आता हीच तन्वी बिग बॉस शो का सोडणार असल्याचं नव्या प्रोमोत दिसून आलं आहे.

advertisement

दो दुश्मन बन बैठे यार? 'बिग बॉस'च्या घरात बनली जोडी! Bigg Boss Marathi 6 मध्ये मोठा ट्विस्ट

बिग बॉसच्या नव्या एपिसोडच्या प्रोमो समोर आला आहे. ज्यात तन्वी आपल्याला हा शो करायचा नाही, आपल्याला शो सोडायचं आहे, असं बोलताना दिसते. याचं कारणही या प्रोमोत आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता बिग बॉसच्या घरात पुन्हा चोरी झाली आहे. विशाल आणि रोशनला चोरी झालेलं सामान सापडतं. यात चॉकलेट, तांदूळ अशा वस्तू आहेत. यावेळी चोरीचा आरोप लावण्यात आला तो तन्वीवर. कारण सामान तिच्या बेडजवळ सापडतं.

advertisement

तन्वी ओरडून ओरडून सांगते ही आपण चोरी केली नाही. पण कुणीच तिच्यावर विश्वास ठेवत नाही. घरातील सगळे सदस्य तन्वीवर तुटून पडतात.  तन्वीला हे सगळं सहन होत होत नाही. ती रडू लागते, वैतागते आणि आपल्याला हा शो करायचा नसल्याचं ती सांगते. तसंच ती तिथून निघून जातानाही दिसते. तिच्या मागोमाग दिपाली सय्यद तिला अडवायला येते, पण तन्वी दिपालीचं ऐकत नाही, ती काही काही थांबत नाही.

advertisement

Bigg Boss Marathi 6 : दिसते तितकी नाही, खूपच बोल्ड आहे Sonali Raut; अभिनेत्रीसोबत KISSING मुळेही आली होती चर्चेत

दरम्यान तन्वीच्या चाहत्यांनी ती असं करणार नाही, असं म्हणत आपण तुझ्या पाठिशी आहोत असं म्हटलं आहे. बहुतेकांनी अनुश्रीच चोर असणार असं म्हटलं आहे. काहींनी तन्वीला तिच्या रडण्यावरून ट्रोल केलं आहे. याआधीही ती बऱ्याचदा रडताना दिसली आहे. त्यामुळे हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी या रडकीला आधी घराबाहेर काढा, खरंच तू घराबाहेर पड आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, असं खोचकपणे म्हटलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

तन्वीने आपल्याला शो करायचं नाही, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडायचं आहे, असा स्वत:चा निर्णय तर जाहीर केला. पण खरंच तिला असं मधेच घरातून बाहेर पडता येईल का? बिग बॉस तिला घरातून बाहेर जाऊ देतील का? हे आता येत्या एपिसोडमध्येच पाहायला मिळेल. पण तन्वी घराबाहेर जायला हवी? खरा चोर कोण असेल? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : सगळ्यांना सोलते ती तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी 6' सोडणार, स्वत:च घराबाहेर पडण्याचा निर्णय; कारण काय?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल