TRENDING:

Birthday Special: 15 मिनिटांच्या रोलसाठी घेतले 4 कोटी, 55 व्या वर्षी चमकलं अभिनेत्याचं नशीब

Last Updated:

Birthday Special : बॉलिवूडमध्ये मोठमोठ्या स्टारकिड्सलाही अपयशाचा सामना करावा लागतो. काही जणांचं नशीब कमी वयात चमकतं तर काहींना खूप स्ट्रगल करून यश मिळतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलिवूडमध्ये मोठमोठ्या स्टारकिड्सलाही अपयशाचा सामना करावा लागतो. काही जणांचं नशीब कमी वयात चमकतं तर काहींना खूप स्ट्रगल करून यश मिळतं. अशाच एका अभिनेत्याविषयी जाणून घेऊया ज्याचं नशीब 55 व्या वर्षी चमकलं. अभिनेत्याचा 27 जानेवारीला वाढदिवस असतो. या निमित्ताने त्याच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
15 मिनिटांच्या रोलसाठी घेतले 4 कोटी
15 मिनिटांच्या रोलसाठी घेतले 4 कोटी
advertisement

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॉबी देओल आहे. बॉबी देओलचा जन्म 27 जानेवारी 1969 रोजी मुंबईत झाला. यंदा तो 55 वा वाढदिवस साजरा करेल. बॉबी धर्मेंद्र यांचा छोटा मुलगा असून 90 च्या दशकात अभिनेत्याची चांगलीच जादू होती. मग काही काळानंतर ही जादू फिकी पडली. पुन्हा 55 व्या वर्षी अभिनेत्याचं नशीब चमकलं.

advertisement

Deepika Padukone: काळा चष्मा, लेदर जॅकेट; आई झाल्यानंतर दीपिकाचा पहिला रॅंप वॉक, दिसला फुल्ल स्वॅग

बॉबी देओलने बालकलाकार म्हणून 1977 मध्ये वडिलांचा चित्रपट 'धरम वीर' मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मुख्य अभिनेता म्हणून त्यांनी 1995 साली 'बरसात' चित्रपटातून डेब्यू केला, ज्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा 'बेस्ट डेब्यू' पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले.

advertisement

बॉबी देओलची 'एनिमल' सिनेमातील भूमिका खूप गाजली. अवघ्या 15 मिनिटांची त्याची भूमिका आयकॉनिक बनली. सिनेमात अभिनेत्याला 15 मिनिटांचा स्क्रीन स्पेस मिळाला होता. यासाठी अभिनेत्याने 4 कोटी रुपये चार्ज केले.

सिनेमांमध्ये काम केल्यानंतर गेल्या काही काळापासून अभिनेता ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहे. 'क्लास ऑफ 83','आश्रम' सारख्या वेब सिरीजमध्ये त्याने दमदार अभिनय केला. त्याच्या भूमिका खूप गाजल्या.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुमचं लग्न ठरायला येत आहेत अडथळे? मग करा हे उपाय, मिळेल नक्कीच लाभ, Video
सर्व पहा

दरम्यान, बॉबी देओलची एकूण संपत्ती सुमारे 90-100 कोटी आहे. चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट्स, आणि ओटीटी प्रोजेक्ट्समधून त्यांची कमाई होते. तो मुंबईतील जुहू येथे आलिशान बंगल्यात राहतो. बॉबीने 1996 मध्ये तान्या अहुजासोबत विवाह केला. तान्या एक यशस्वी व्यवसायिका असून त्यांनी इंटिरियर डिझाइनिंगही केलं आहे. त्यांना दोन मुलं आहेत. आर्यमान आणि धरम.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Birthday Special: 15 मिनिटांच्या रोलसाठी घेतले 4 कोटी, 55 व्या वर्षी चमकलं अभिनेत्याचं नशीब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल