Deepika Padukone: काळा चष्मा, लेदर जॅकेट; आई झाल्यानंतर दीपिकाचा पहिला रॅंप वॉक, दिसला फुल्ल स्वॅग

Last Updated:

Deepika Padukone: बॉलिवूडची फॅशन क्वीन दीपिका पादुकोण सध्या चर्चेत आहे. दीपिका नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना घायाळ करत असते.

आई झाल्यानंतर दीपिकाचा पहिला रॅंप वॉक
आई झाल्यानंतर दीपिकाचा पहिला रॅंप वॉक
मुंबई : बॉलिवूडची फॅशन क्वीन दीपिका पादुकोण सध्या चर्चेत आहे. दीपिका नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. आई झाल्यानंतर दीपिकाने कामातून थोडा ब्रेक घेतला होता. आई बनल्यानंतर दीपिकाचा पहिला रॅंप वॉक सध्या चर्चेचा विषय ठरतोय. दीपिकाने सब्यसाची मुखर्जीच्या 25 व्या अ‍ॅनिव्हर्सरी शोमध्ये सहभाग घेतला होता. तिचा लूक सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे.
दीपिका पादुकोण सब्यसाची मुखर्जीच्या 25 व्या अ‍ॅनिव्हर्सरी शोची शोस्टॉपर होती. दीपिकाने एकदम हटके स्टाइलमध्ये शोची ओपनिंग केली. दीपिकाचा शोस्टॉप लूक पाहून सर्वांना एव्हरग्रीन रेखाची आठवण झाली. दीपिका अगदी रेखासारखीच दिसत होती. त्यामुळे अनेकांना समोर आलेल्या व्हिडिओ, फोटोंमध्ये दीपिकामध्ये रेखाच दिसली.
advertisement
लेदर जॅकेट, काळा चष्मा, क्लासी लूक, अगदी रेखा सारखाच होता. अभिनेत्रीचे आकर्षक स्मोकी डोळ्यांनी चाहत्यांना घायाळ केलं. दीपिकाचे हे फोटो, व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. आई झाल्यानंतर दीपिकाचा हा पहिलाच शो असल्यामुळे सर्वजण दीपिकासाठी खूप उत्सुक होते. आणि तिने नेहमीप्रमाणे सर्वांना थक्क केलं.
advertisement
सब्यसाची मुखर्जीचा 25 वा अ‍ॅनिव्हर्सरी शो होता. भारताच्या टॉपच्या डिझायनरमध्ये सब्यसाचीचं नाव येतं. तिची हटके फॅशन, युनिक कलेक्शन नेहमीच ग्राहकांना आकर्षित करतं. हा सेलिब्रिटींचाही लाडका ब्रँड आहे. त्यामुळे या शोसाठी सर्वच सेलिब्रिटींचा मेळावा पहायला मिळाला. सर्वजण अगदी क्लासी आऊटफिटमध्ये या शोसाठी हजर झाले होते.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Deepika Padukone: काळा चष्मा, लेदर जॅकेट; आई झाल्यानंतर दीपिकाचा पहिला रॅंप वॉक, दिसला फुल्ल स्वॅग
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement