पुणेकरांनो आता रिक्षात बसतानाही सावधान; प्रवाशासोबत रिक्षाचालकानंच केलं कांड, 2 दिवसात पोलिसांनी घडवली अद्दल
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
दोन दिवसांपूर्वी वाकडेवाडी बसस्थानक परिसरातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला या रिक्षाचालकाने लुटले होते. रिक्षामध्ये सामान ठेवल्यानंतर प्रवाशाची नजर चुकवून त्याने बॅगेतील २४ हजार रुपयांची रोकड लंपास केली होती.
पुणे : रिक्षाने प्रवास करताना आपलं सामान आणि रोकड सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण करणारी एक घटना नुकतीच पुण्यात उघडकीस आली आहे. प्रवाशाच्या सामानातील रोकड चोरणाऱ्या एका सराईत रिक्षाचालकाला गुन्हे शाखा युनिट-चारच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
दोन दिवसांपूर्वी वाकडेवाडी बसस्थानक परिसरातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला या रिक्षाचालकाने लुटले होते. रिक्षामध्ये सामान ठेवल्यानंतर प्रवाशाची नजर चुकवून त्याने बॅगेतील २४ हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. बसस्थानक परिसरातील रिक्षाचालकाचा हा प्रताप उघड झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
advertisement
सापळा रचून अटक
गुन्हे शाखा युनिट-चारच्या पथकाला माहिती मिळाली की, संबंधित रिक्षाचालक पुन्हा त्याच परिसरात सावज शोधण्यासाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाकडेवाडी बसस्थानक परिसरात सापळा रचला. संशयास्पद रिक्षा येताच पोलिसांनी ती अडवली आणि चालकाची कसून चौकशी केली. इद्रिस शफीक शेख (वय ३६, रा. बावधन, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे या आरोपीचे नाव असून, त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.
advertisement
पोलिसांनी इद्रिसकडून चोरीची २४ हजारांची रोकड हस्तगत केली आहे. तसेच, गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बसस्थानक परिसरात प्रवाशांना लुटणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 11:42 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो आता रिक्षात बसतानाही सावधान; प्रवाशासोबत रिक्षाचालकानंच केलं कांड, 2 दिवसात पोलिसांनी घडवली अद्दल








