advertisement

भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत कोणार्क आघाडीला महत्त्व, त्याआधी 'किंगमेकर'ला उचललं, माजी महापौर विलास पाटील यांना अटक

Last Updated:

Bhiwandi Vilas Patil Arrest: भिवंडी महापालिकेत सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या विलास पाटील यांना अटक करण्यात आली आहे.

विलास पाटील
विलास पाटील
अजित मांढरे, प्रतिनिधी, ठाणे : भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीआधी भिवंडीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. ⁠भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांना अटक करण्यात आली आहे. ⁠ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने विलास पाटील यांना काल रात्री अटक केली.
विलास पाटील हे ⁠कोणार्क विकास आघाडीचे नेते आहेत. भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या घडामोडींदरम्यान त्यांना अटक केल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे. विलास पाटील यांना शनिवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात येईल.

सत्तास्थापनेकरिता काय काय घडामोडी घडत होत्या?

⁠काही दिवसांपूर्वीच विलास पाटील आणि भाजपा आमदार महेश चौगुले यांच्यात भर रस्त्यात मोठा राडा झाला होता. ⁠भिवंडीत ज्यांची संख्या जास्त त्यांचा महापौर असे सूत्र महायुतीत ठरले आहे. ⁠यानुसार विलास पाटील यांची कोणार्क आघाडी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती. ⁠असे असतानाच विलास पाटील यांना २०२५ मध्ये दाखल झालेल्या प्रकरणात अटक करण्यात आलीये. ⁠घरे देण्याच्या बहाणे अनेकांची विलास पाटील यांनी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होता. ⁠भाजपाने ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.
advertisement

कोणार्क आघाडी भिवंडीत सत्ता स्थापनेकरिता किंगमेकर

⁠विलास पाटील यांच्या कोणार्क आघाडीचे ५ नगरसेवक आहेत. ⁠कोणार्क आघाडी भिवंडीत सत्ता स्थापनेकरिता किंगमेकर ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विलास पाटील यांना अटक करण्यात आल्याची चर्चा भिवंडीत आहे.
भिवंडी पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. असे असताना शिवसेनेचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या. त्यांच्या विनंतीला मान देऊनच विलास पाटील यांची कोणार्क विकास आघाडी सेनेला पाठिंबा देणार होती. पण त्याआधीच विलास पाटील यांना अटक करण्यात आल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
advertisement

भिवंडी एकूण जागा- ९०

बहुमत आकडा- ४६
काँग्रेस - 30
समाजवादी - 6
राष्ट्रवादी (शप)- 12
भाजपा - 22
शिवसेना (शिंदे) - 12
कोणार्क विकास आघाडी - 4
भिवंडी विकास आघाडी - 3
अपक्ष -1
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत कोणार्क आघाडीला महत्त्व, त्याआधी 'किंगमेकर'ला उचललं, माजी महापौर विलास पाटील यांना अटक
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement