advertisement

भोरमधील धरण परिसरात गप्पा मारत होते तरुण, अचानक तरंगताना दिसला हात, जवळ जाताच खळबळ

Last Updated:

पुण्याच्या भोर तालुक्यातील चिखलगाव रावडी गावाच्या हद्दीत असलेल्या धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यात एका ३० ते ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील चिखलगाव रावडी गावाच्या हद्दीत असलेल्या धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यात एका ३० ते ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची ओळख पटली असून राधिका सुरेश सावंत असे मृत महिलेचं नाव असल्याचं निष्पन्न झालं आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यातून एक मृतदेह वाहून जात असल्याचे काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. पाटाच्या पाण्यात मृतदेह पाहताच नागरिकांनी तातडीने याची माहिती भोर पोलिसांना दिली. माहिती मिळताच भोर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांकडून मृतदेह बाहेर

पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कालव्यातील मृतदेह पाण्याबाहेर काढला. प्राथमिक तपास आणि मृतदेहाजवळील पुराव्यांवरून ही महिला राधिका सुरेश सावंत असल्याची ओळख पटली आहे. मृत राधिका यांचे वय साधारण ३० ते ३५ वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement

घातपात की आत्महत्या? पोलिसांचा तपास सुरू

राधिका सावंत यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यांनी कालव्यात उडी मारून आत्महत्या केली की हा एखादा घातपाताचा प्रकार आहे, यादृष्टीने भोर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल. या घटनेमुळे चिखलगाव रावडी परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भोरमधील धरण परिसरात गप्पा मारत होते तरुण, अचानक तरंगताना दिसला हात, जवळ जाताच खळबळ
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement