advertisement

Astrology: महाशिवरात्रीनंतर बॅडलक! सूर्य ग्रहणादिवशी चंद्राचे डबल गोचर! 3 राशींना भयंकर त्रासाचे संकेत

Last Updated:
Astrology: 17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी सुरू होऊन संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटांपर्यंत चालेल.
1/6
ग्रहण भारतात दिसणार नसल्याने सूतक काळ पाळला जाणार नसला, तरी ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दिवशी चंद्राच्या स्थितीत दोनदा बदल होणार असून त्याचा सर्व राशींवर प्रभाव पडू शकतो.

2/6
द्रिक पंचांगानुसार 17 फेब्रुवारीच्या सकाळी 9 वाजून 05 मिनिटांनी चंद्र कुंभ राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर रात्री साधारण 9 वाजून 15 मिनिटांनी तो शतभिषा नक्षत्रात जाईल. एकाच दिवशी राशी आणि नक्षत्र अशा दोन्ही स्थितींमधील बदलाला चंद्राचा डबल गोचर असे म्हटले जात आहे.

3/6
या बदलामुळे काही राशींच्या व्यक्तींनी विशेष सावध राहणे गरजेचे आहे. सूर्यग्रहणाच्या दिवशी होणाऱ्या या बदलांमुळे खालील राशींना सतर्क राहावे लागेल.

4/6
मेष- मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा अस्थिर राहण्याची शक्यता आहे. तुमचे मन अस्वस्थ राहू शकते आणि लहान कारणांमुळे तणाव वाढू शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः डोकेदुखी किंवा अशक्तपणा यांसारख्या समस्या तुम्हाला सतावू शकतात. विवाहित व्यक्तींनी संवादावर संयम ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा नात्यात कडवटपणा येऊ शकतो.

5/6
तूळ - राशीच्या व्यक्तींना भावनिक दबाव जाणवू शकतो. कुटुंबात एखाद्या विषयावरून गैरसमज किंवा दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत विचारपूर्वक पाऊल उचलणे श्रेयस्कर ठरेल, कारण घाईघाईत घेतलेला निर्णय नुकसानकारक ठरू शकतो. या काळात गुंतवणूक किंवा मोठी आर्थिक जोखीम पत्करणे टाळणेच शहाणपणाचे ठरेल.

6/6
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील हा दिवस आव्हानात्मक असू शकतो. जोडीदाराचा किंवा भागीदाराचा सल्ला डावलणे महागात पडू शकते. आरोग्याच्या दृष्टीने विचार करता पोट किंवा पचनाशी संबंधित तक्रारी समोर येऊ शकतात. पैशांच्या बाबतीत संयम ठेवा, कारण अपेक्षेप्रमाणे लाभ मिळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement