Mamta Kulkarni: ममता कुलकर्णी कशी बनली महामंडलेश्वर? संन्यास घेतल्यावर सांगितलं तपस्येसाठी काय काय केलं

Last Updated:

Mamta Kulkarni: अभिनेत्री ममता कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. अभिनेत्रीने महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला.

 ममता कुलकर्णी कशी बनली महामंडलेश्वर?
ममता कुलकर्णी कशी बनली महामंडलेश्वर?
मुंबई : अभिनेत्री ममता कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. अभिनेत्रीने महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला. ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे. अभिनेत्रीने पिंडदान केलं त्यानंतर अभिनेत्रीचा दुधाने अभिषेक करण्यात आला. अशातच आता ममता कुलकर्णीने संन्यास घेतल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ममता कुलकर्णीने संन्यास घेतल्यावर पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. अभिनेत्री म्हणाली, "हा मुहूर्त 144 वर्षांनी आलाय. या क्षणी मला महामंडलेश्वर बनवण्यात आलं. हे फक्त आदिशक्तीच करू शकते. मी किन्नर आखाडा फक्त यासाठीच निवडला, कारण इथे कोणती बंदी नाहीये, स्वतंत्र आखाडा आहे."
advertisement
ममता कुलकर्णी पुढे म्हणाली, "तुम्हाला जीवनात सगळं हवं असतं. मनोरंजनही हवं असतं. सगळ्या गोष्टीची गरज असायला हवी, ध्यान अशी गोष्ट आहे जी भाग्याने प्राप्त होते. गौतम बुद्ध यांनीही खूप काही पाहिलं होतं मग स्वतःमध्ये परिवर्तन केलं."
ममता कुलकर्णी कशी बनली महामंडलेश्वर?
महामंडलेश्वर बनल्यानंतर ममता कुलकर्णी म्हणाली, "चार जगतगुरुंनी माझी परीक्षा घेतली. माझ्या उत्तरांनी त्यांना समजलं की मी किती तपस्या केली आहे. मला दोन दिवसांपासून आग्रह करत होते की, महामंडलेश्वर बना तर मी म्हटलं मला उपाधीची काय आवश्यकता. पोलीस काय घरीही युनिफॉर्म घालतात का?"
advertisement
ममता कुलकर्णीला पुन्हा सिनेमांमध्ये काम करण्याविषयी विचारलं. तर ममता म्हणाली, "याची आता कल्पनाही करू शकत नाही. आता हे माझ्याकडून होणार नाही. किन्नर आखाड्यामध्ये लोक स्वतः परमेश्वराचं रूप आहेत. सदा शिव आदिशक्तीचं रूप आहेत. माझी 23 वर्षांचा अभ्यास हा ऑलिंपिक अवॉर्ड सारखा आहे."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mamta Kulkarni: ममता कुलकर्णी कशी बनली महामंडलेश्वर? संन्यास घेतल्यावर सांगितलं तपस्येसाठी काय काय केलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement