Mamta Kulkarni: ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, महाकुंभात जाऊन बनली किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर

Last Updated:

Mamta Kulkarni At Maha kumbh 2025: अभिनेत्री सध्या प्रयागराज महाकुंभला पोहोचली आहे. याविषयी तिने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.

अभिनेत्री ममता कुलकर्णीने घेतला संन्यास
अभिनेत्री ममता कुलकर्णीने घेतला संन्यास
मुंबई :  90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिने आपल्या सौदर्याने प्रेक्षकांना घायाळ केलं होतं. ती अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. मात्र काही दिवसांपूर्वी ती पुन्हा चर्चेत आली आणि तेव्हापासून तिच्याविषयी सतत काही नाही माहिती समोर येत आहेत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ममता कुलकर्णी आहे. अभिनेत्री सध्या प्रयागराज महाकुंभला पोहोचली आहे. याविषयी तिने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.
ममता कुलकर्णीने महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला आहे. किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवलं जात आहे. ज्यामध्ये ममता कुलकर्णी यांना चादर पोशी विधी करून महामंडलेश्वर ही पदवी दिली गेली.
ममता कुलकर्णीला आजपासून नवीन नाव दिलं जाईल. ममता कुलकर्णी आता श्री यामाई ममता नंद गिरि नावाने ओळखली जाईल. जुना आखाडाचे आचार्य नारायण त्रिपाठी यानी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीने भगवे वस्त्र धारण केले आहेत.
advertisement
advertisement
दरम्यान, ममता कुलर्णीने संन्यास घेतल्यानंतरचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव पहायला मिळतोय.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Mamta Kulkarni: ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, महाकुंभात जाऊन बनली किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement